शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
8
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
9
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
10
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
11
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
12
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
13
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
14
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
15
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
16
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
17
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
18
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
19
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
20
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
Daily Top 2Weekly Top 5

"तू 'लाडक्या बहिणी'त नाही, तुझ्यामुळे माझे नुकसान" पतीने लाडक्या बहिणीच्या पैशांसाठी केली बेल्टने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:50 IST

Amravati : एफआयआरनुसार, पीडितेचा आणि आरोपी आकाशचा सुमारे दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर तक्रारदार पत्नीने नवीन आधारकार्ड काढण्यासाठी आणि त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तिचे नवीन आधारकार्ड तयार झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तुझ्या चुकीमुळे तुझे आधारकार्ड निघाले नाही. परिणामी अख्ख्या महिलांना १५०० रुपये प्रतिमहिना मिळत असताना तू मात्र त्या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. परिणामी, तुझे नव्हे तर माझे मोठे नुकसान होत असल्याचा निष्कर्ष काढत एका मद्यपी पतीने पत्नीस बेल्टने बेदम मारहाण केली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सार्सी येथे ३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ती घटना घडली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी आरोपी पती आकाश (२८) याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

एफआयआरनुसार, पीडितेचा आणि आरोपी आकाशचा सुमारे दीड वर्षापूर्वी विवाह झाला आहे. लग्नानंतर तक्रारदार पत्नीने नवीन आधारकार्ड काढण्यासाठी आणि त्यावर पतीचे नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु तांत्रिक अडचणींमुळे तिचे नवीन आधारकार्ड तयार झाले नाही. यामुळे तिला 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभासाठी नोंदणी करता आली नाही, त्यामुळे ती दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिली. गावातील इतर महिलांना या योजनेचा लाभ मिळत असताना, पत्नीला मदत न मिळाल्याने आरोपी पती आकाश वारंवार पत्नीवर संताप व्यक्त करत होता. तशातच ती अमरावतीहून परत आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा पत्नीशी वाद घातला. याप्रकरणी लोणी पोलिसांनी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी आरोपी आकाशविद्ध गुन्हा दाखल केला. 

काय घडले नेमके ?

फिर्यादी महिला अमरावतीला दवाखान्यात गेली होती. ३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ती सार्सी येथे परतली असता आरोपी पती हा दारू पिऊन घरी आला. तुझ्यामुळेच तुझे आधार कार्ड निघालेले नाही. त्यामुळे तुला लाडकी बहीण योजनेचा लाभमिळत नाही.

ती १५०० रुपये प्रतिमहिना रक्कम मिळत नसल्याने माझे नुकसान होत आहे, असे तो बरळला. त्याने पत्नीला शिवीगाळ केली. मद्यधुंद अवस्थेत त्याने पत्नीला कमरेच्या बेल्टने पाठीवर डाव्या बाजूला, डाव्या पायावर व मांडीवर बेदम मारहाण केली. तथा मारण्याची धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रमोद गिरडकर हे करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk husband beats wife for missing 'Ladki Bahin' money.

Web Summary : A drunk husband in Sarsi beat his wife with a belt because her Aadhar card issues prevented her from receiving the 'Ladki Bahin' scheme's ₹1500 monthly payment, which he considered his loss. Police have registered a case against the husband.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAmravatiअमरावतीgovernment schemeसरकारी योजनाCrime Newsगुन्हेगारी