आष्टी, वायगाव येथे योग शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:10 IST2021-06-23T04:10:26+5:302021-06-23T04:10:26+5:30

टाकरखेडा संभू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आष्टी व वायगाव येथे योग प्रशिक्षक उमा मदने (जवंजाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर ...

Yoga camp at Ashti, Wayagaon | आष्टी, वायगाव येथे योग शिबिर

आष्टी, वायगाव येथे योग शिबिर

टाकरखेडा संभू : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आष्टी व वायगाव येथे योग प्रशिक्षक उमा मदने (जवंजाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर आरोग्यवर्धिनी केंद्रात पार पडले.

शासनाच्यावतीने आष्टी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र व उपकेंद्रामध्ये दर आठवड्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल उप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व उमा मदने (जवंजाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिर घेण्यात येते. २१ जून रोजी वायगाव उपकेंद्रात सकाळी ७ ते ८ या कालावधीत योग शिबिर घेण्यात आले. त्यावेळी मंगला अठवर्धन व गावातील लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सकाळी ९ ते १० या वेळेत आष्टी येथे योग शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. श्रद्धा वर्मा, डॉ. सुषमा देशमुख (आयुर्वेदिक), डॉ. विशाल जाधव, डॉ. विशाल अस्वार, देशमुख, आरती सुर्वे, कांबळे, माहोरे, गोबरे, गणेश मावळे, नंदू खानंदे, राजू वानखडे आदी उपस्थित होते.

===Photopath===

220621\img-20210622-wa0081.jpg

===Caption===

प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी येथे योगा करताना

Web Title: Yoga camp at Ashti, Wayagaon