येवदा पोलिसांची वरली मटक्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST2021-06-16T04:17:11+5:302021-06-16T04:17:11+5:30
येवदा पोलिसांनी नजीकच्या अंतरगाव येथील पुलाजवळून श्रीकृष्ण सखाराम वाकोडे (रा. बांबर्डा) याच्याकडून सट्टापट्टीचा कागद व रोख १७८० रुपये, ...

येवदा पोलिसांची वरली मटक्यावर कारवाई
येवदा पोलिसांनी नजीकच्या अंतरगाव येथील पुलाजवळून श्रीकृष्ण सखाराम वाकोडे (रा. बांबर्डा) याच्याकडून सट्टापट्टीचा कागद व रोख १७८० रुपये, पेन, दोन मोबाईल असा एकूण ११ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरूड कुलट येथे टाकलेल्या धाडीत रमेश उर्फ चतुर रमेश पुडकर याच्याकडून सट्टापट्टीचा कागद, रोख १२३० रुपये पेन, मोबाईल असा २२३५ रुपयांचे मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवाया येवद्याचे ठाणेदार अमुल बच्छाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी दिलीप चव्हाण, संजय रायबोले, अर्जुन मुंडे, सुमेध गवई यांनी केली. कासमपूर येथील कैलास गुलाबराव घाटे याच्याकडूनही सट्टापट्टीचा कागद, रोख २४६०, पेन, मोबाईल असा ३४६५ रुपयांचा मुद्देमाल आढळला. आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. येवदा व परिसरातील अवैध धंद्यांची माहिती नागरिकांनी द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन ठाणेदार अमुल बच्छाव यांनी केले आहे.