यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पर्वणीचा कोरोनामुळे विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:23+5:302021-02-05T05:26:23+5:30

अमरावती : नवीन वर्ष सुरू झाले की शाळेतील विद्यार्थी शिक्षकांना वेध लागायचे ते प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारीचे, या ...

This year, the Republic Day celebrations were canceled due to corona | यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पर्वणीचा कोरोनामुळे विरजण

यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पर्वणीचा कोरोनामुळे विरजण

अमरावती : नवीन वर्ष सुरू झाले की शाळेतील विद्यार्थी शिक्षकांना वेध लागायचे ते प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारीचे, या दरम्यान शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात . कला क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमामुळे आनंद द्विगुणित होत असते. परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे शाळा बंदच आहे. त्यामुळे यावर्षी तरी विद्यार्थ्यांचा या पर्वणी ठरणाऱ्या वार्षिक सणाच्या आनंदावर विरजण पडणार आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान देणे उपयुक्त नसते तर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शाळेत प्रजासत्ताक दिनाचे काही दिवस अगोदरपासून ते २६ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. कवायती, क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा यासारखे उपक्रम साजरे केले जातात. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळून आज घडलेल्या कला तसेच अविष्कारांना या निमित्ताने व्यासपीठ मिळते आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आपल्या पाल्याचा नृत्याविष्कार उत्कृष्टपणे सादर होण्यासाठी अख्खे कुटुंब यातही सहभागी होऊन मुलांना बळ देण्याचे काम करतात. लहान मुलांच्या वेशभूषेच्या तयारीपासून ते मेकअप करण्यापर्यंत शिक्षक तसेच पालकांची धावपळ असायची आणि यातून वेगळाच आनंद मिळत असल्याने विद्यार्थी खो-खो, कबड्डी, रनिंग ,चित्रकला, चमचा लिंबू ,दोरीवरच्या उड्या, कवायतीचे विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेत असे पुढे महाविद्यालयीन शिक्षणात विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळाविषयी माहिती होऊन शारीरिकदृष्ट्या परिपक्व होण्यास मदत होत असे स्पर्धेत विजेत्यास मिळणारे बक्षीस प्रमाणपत्रमुळे विद्यार्थी उत्साहाने आपल्या पालकांना दाखवत असत. आपल्या मुला-मुलींची कामगिरीपण पालकांचा आनंद गगनात मावेनासा होत असतो.

बॉक्स

विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण

२६ जानेवारी रोजी शाळेच्या प्रांगणात विविध प्रकारच्या सादरीकरणासाठी प्रत्यक्ष लगीन घाई असायची स्वागत गीत देशभक्तीपर गीत नृत्य नाटिकांचे एकापाठोपाठ एक सादरीकरण करून संपूर्ण वातावरण देशभक्तीने मन प्रफुल्लित करत असे मात्र यावर्षी तरी हा आनंद कोरोनामुळे विद्यार्थ्यांना उपभोगता येणार नाही.

कोट

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या मैदानावर पहिलीपासून कवायत तसेच विविध शालेय उपक्रम राबविण्यात येते. मात्र कोरोनामुळे यावर्षी आमचे कोणते संस्कृती कार्यक्रम होणार नसल्याने निराश झाली आहे.

कांचन उके

विद्यार्थिनी

Web Title: This year, the Republic Day celebrations were canceled due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.