यंदा वसतिगृहांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवेश
By Admin | Updated: May 17, 2014 23:10 IST2014-05-17T23:10:10+5:302014-05-17T23:10:10+5:30
मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शासनाच्या अनुदानित व शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन करण्यात आली आहे.

यंदा वसतिगृहांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवेश
>अमरावती : मागासवर्गीय मुला-मुलींची शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी शासनाच्या अनुदानित व शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यंदा ऑनलाईन करण्यात आली आहे. राज्यातील कुठल्याही विद्यार्थ्याला याचा लाभ व्हावा, यासाठी समाजकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी त्याचप्रमाणे समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत बहुतांश तालुका व जिल्हा मुख्यालयी वसतिगृह सुरू करण्यात आले. याठिकाणी प्रवेश घेण्याकरिता मुला-मुलींना यापूर्वी हेलपाटे घ्यावे लागत होते. परंतु यावर्षीपासून वसतिगृह प्रवेशासाठी ‘ऑनलाईन’ सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. समाजकल्याण विभागाच्या संकेतस्थळावर याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)