यंदा नैसर्गिक आपत्तीत ५१ व्यक्तींचा मृत्यू
By Admin | Updated: December 21, 2015 00:10 IST2015-12-21T00:07:43+5:302015-12-21T00:10:21+5:30
यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २१ सप्टेंबरदरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. ९२५ कुटुंब बाधित झाली तर ६ हजार ७३४ घरांची पडझड झाली आहे.

यंदा नैसर्गिक आपत्तीत ५१ व्यक्तींचा मृत्यू
अमरावती विभाग : ९२५ कुटुंब बाधित, ६ हजार ७३४ घरांची पडझड
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २१ सप्टेंबरदरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. ९२५ कुटुंब बाधित झाली तर ६ हजार ७३४ घरांची पडझड झाली आहे.
अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये १२ व्यक्तींचा मृत्यू झाला. या मध्ये ७ व्यक्ती हे पुरात वाहून गेले. व ५ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात २ व्यक्ती पुरात वाहून गेले व ७ व्यक्ती वजी अंगावर पडून दगावले. यवतमाळ जिल्ह्यात ८ व्यक्ती पुरात वाहून गेले व ७ व्यक्तीचा विज पडू मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात ३ व्यक्ती पुरात वाहून गेलेत व ५ व्यक्ती वीज पडून मृत्यूमुखी पडले. वाशीम जिल्ह्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला व ६ व्यक्ती वीज पडून मृत्यूमुखी पडले. विभागात पुरात वाहून गेल्याने २० व्यक्तींचा मृत्यू झाला. १ दरड कोसळून व ३० व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३ तालुक्यांमधील २७२ गावे व ९२५ कुटुंबे बाधित झालीत. यामध्ये १ हजार ४२५ व्यक्तींचा समावेश आहे.
या पैकी १९२ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. ४४ व्यक्ती ह्यात जख्मी झाल्यास. तसेच ५ हजार ४२५ हेक्टर मधील शेतीपिकांचे नुकसान झाले.
तसेच ५ हजार ४२५ हेक्टर मधील शेतीपिकांचे नुकसान झाले व १७ हजार १५७ हेक्टर ४४ आर क्षेत्रामधील शेती पिके बाधित झाली.
विभागात आपत्तीमुळे ७७ मोठी दुधाळ जनावरे मृत झाली. या पैकी ७० प्रकरणात १९ लाख ५२ हजारची मदत देण्यात आली ५२ लहान दुथाळ जनावरे मृत झाली.
यामध्ये ३८ प्रकरणांत १ लाख ८९ हजाराची मदत देण्यात आलेली आहे. ओढकाम ७० जनावरचा आपत्तीमध्ये मृत्यु झाला. या पैकी ४८ प्रकरणात १२ लाख ४८ हजाराची मदत जनावरांच्या मालकांना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक घरांची पडझड
विभागात यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७३४ घरांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक २ हजार ६४२ घरांचे नुकसान अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. विभागात ७६ घरे पूर्णत: पडली. या साठी ४ कोटी ५७५ लाखाचे अनुदान देण्यात आलेले आहे. २ हजार ७९२ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये ३०४ प्रकरणांत १३ लाख ९ हजारांचे अनुदान देण्यात आले. ३ हजार ८५९ कच्च्या घरांचे नुकसान झाले. यापैकी २ हजार ४९४ पात्र प्रकरणात १३ लाख ६२ हजारांची मदत देण्यात आलेली आहे. ७ झोपड्या व २५ गोठे बाधित झाले.