यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: November 22, 2014 22:52 IST2014-11-22T22:52:03+5:302014-11-22T22:52:03+5:30
आमदार यशोमती ठाकूर यांचे वाहन रोखून त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी प्रहार संघटनेचे संजय देशमुख यांच्याविरूध्द तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदिवला आहे.

यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
गाडी रोखली : प्रहारचे संजय देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल
तिवसा : आमदार यशोमती ठाकूर यांचे वाहन रोखून त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी प्रहार संघटनेचे संजय देशमुख यांच्याविरूध्द तिवसा पोलिसांनी गुन्हा नोंदिवला आहे.
शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या दरम्यान आ. यशोमती ठाकूर या पंचायत समिती निवडणुकीमधील उमेदवारांच्या बैठकीसाठी शिरजगाव (मोझरी) येथे जात होत्या. वाटेत आमदार ठाकूर यांचे वाहन अडवून प्रहारचे संजय देशमुख यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आमदार ठाकूर यांच्या या आशयाच्या तक्रारीवरून संजय देशमुख यांच्याविरोधात तिवसा पोलिसांनी भादंविच्या २९४, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
तिवसा पंचायत समितीची निवडणूक असल्याने याच गणात संजय देशमुख यांच्या पत्नीदेखील प्रहारच्या उमेदवार आहेत. निवडणुकीच्या वादातूनच हा प्रसंग उद्भवल्याची चर्चा आहे.