खरेदी विक्री संस्थेवर यशोमती ठाकूर गटाची बाजी

By Admin | Updated: July 26, 2016 00:24 IST2016-07-26T00:24:44+5:302016-07-26T00:24:44+5:30

तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आ.यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात प्रशांत काळबांडे यांचे नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे सर्वच १७ संचालक विजयी झालेत, ...

Yashomati Thakur group's betting on the buying company | खरेदी विक्री संस्थेवर यशोमती ठाकूर गटाची बाजी

खरेदी विक्री संस्थेवर यशोमती ठाकूर गटाची बाजी

अमरावती तालुका : सहकार गटाचे १७ संचालक विजयी
अमरावती : तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आ.यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात प्रशांत काळबांडे यांचे नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे सर्वच १७ संचालक विजयी झालेत, तर प्रतिस्पर्धी स्वाभिमानी पॅनेलला दारुण पराभव पत्करावा लागला.
सहकार क्षेत्रात महत्त्वाची समजली जाणाऱ्या अमरावती खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत प्रशांत काळबांडे यांचे सहकार पॅनेल व प्रकाश काळबांडे यांचे स्वाभिमानी पॅनेल परस्परांसमोर उभे ठाकले होते. रविवारी शहरातील सहा मतदार केंद्रांवर मतदान घेण्यात आले व सोमवारी येथील बीपीएड कॉलेजमध्ये मतमोजणी करण्यात आली.
यावेळी सहकार पॅनेलचे सर्वच १७ ही संचालक विजयी झालेत. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून मनोज शंकरराव अर्मळ, ज्ञानेश्वर रामभाऊ ठाकरे, विजय दामोधर धर्माळे, संजय भूजंगराव निचित, ईस्माईल खॉ पठान, विक्रांत प्रभाकर भुयार, सुनील मानकर, विकास यावलीकर वैयक्तिक मतदारसंघात प्रशांत काळबांडे, नंदकिशोर काळे, मुकुंंद देशमुख, सुरेश यावल, महिला राखीव मतदारसंघात चंदा कोकाटे, आशा होले, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघात अरुण मिलके, विमुक्त जाती मतदारसंघात सतीश गोटे हे संचालक विजयी झालेत. आ.यशोमती ठाकूर, माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या उपस्थितीत विजयी संचालकांनी जल्लोष केला. सोमवारी काढलेल्या विजयी मिरवणुकीत नागरिकांचा सहभाग होता

Web Title: Yashomati Thakur group's betting on the buying company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.