यशोमती ठाकूर यांनी केले शेतकरी कुटुंबाचे सांत्वन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:15 IST2018-02-27T22:15:51+5:302018-02-27T22:15:51+5:30
आ. यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील घोटा येथे सागर महिंगे याच्या आत्महत्येने आधार गमावलेल्या कुटुंबाला भेट दिली.

यशोमती ठाकूर यांनी केले शेतकरी कुटुंबाचे सांत्वन
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आ. यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यातील घोटा येथे सागर महिंगे याच्या आत्महत्येने आधार गमावलेल्या कुटुंबाला भेट दिली. सागरने नापिकीच्या नैराश्यातून सोमवारी आत्महत्या केली.
आमदार यशोमती ठाकूर यांनी महिंगे कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली. त्यांचे आई वडील, बहिणी यांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला व सरकारी मदत मिळण्याबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मृत सागरच्या वडिलांनी शेतमालाला हमीभाव व कुठलीही सरकारी मदत न मिळत नसल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले. यावेळी आ. यशोमती ठाकूर, पंचायत समिती उपसभापती लुकेश केने, तिवसा नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रीतेश पांडव, संदीप आमले, घोट्याचे सरपंच विनोद राठोड, शिरकरे काका, राजेश इंगोले, जितेंद्र ठाकूर, प्रद्युम्न पाटील व गावकरी उपस्थित होते.