याकूबच्या समर्थकांना मारले जोडे

By Admin | Updated: July 28, 2015 00:49 IST2015-07-28T00:49:54+5:302015-07-28T00:49:54+5:30

याकूब मेमन याची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या समर्थकांच्या पोस्टरांवर प्रहारने राजकमल चौकात ...

Yakub's supporters killed | याकूबच्या समर्थकांना मारले जोडे

याकूबच्या समर्थकांना मारले जोडे

नारेबाजी : प्रहारचे राजकमल चौकात आंदोलन
अमरावती : याकूब मेमन याची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या समर्थकांच्या पोस्टरांवर प्रहारने राजकमल चौकात जोडे मारून सोमवारी सायकांळी निषेध नोंदविला. तीव्र नारेबाजी करून याकूबच्या समर्थकांविरोधात रोष व्यक्त केला.
माहितीनुसार, याकूब मेमनला नागपूरच्या कारागृहात फाशी देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. त्यामुळे याकूबच्या काही समर्थकांनी फाशी रद्द करून सश्रम कारावासाची मागणी केली आहे. मात्र, न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यातच सलमान खान यांनेही याकूब समर्थनात बयाण दिले होते. मात्र, त्याने माफी मागितली आहे. याकूबविषयी भारतीय असतानाही समर्थन दाखविल्याचा विरोध प्रहार सोमवारी निदर्शने करून केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात याकूबच्या समर्थकांचा निषेध करून त्यांच्या पोस्टरांवर जोडे मारून काळे फासले. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी छोटू महाराज, धीरज जयस्वाल, योगेंद्र मोहोड़, मित्रविंद पुरोहित, मनोज शर्मा, परमानंद शर्मा महाराज, सचिन गवाडे, संजय माहुलकर, बबलू माहुलकर, प्रदीप सांगोले, चंदू खेड़कर, रामू काठोडे आदी उपस्थित होते.

याकूबला
फाशी देऊ नका
याकूब मेमनला फाशी देऊ नका, अशा मागणीचे निवेदन सोमवारी एका मुस्लिम संघटनेने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले. त्यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पत्र देण्यात यावे, अशी मागणी शाखेने केली आहे.

Web Title: Yakub's supporters killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.