कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप !
By Admin | Updated: October 25, 2016 00:09 IST2016-10-25T00:09:37+5:302016-10-25T00:09:37+5:30
स्त्रीशक्तीचे कार्य-कर्तृत्व अतुलनीय आहे. स्त्रीशक्ती म्हणजे स्त्रीत्व आणि अस्तित्व जपणारा एक प्रवाह. या प्रवाहात अनेकींना दिशा सापडली आहे.

कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप !
उपक्रम : आज होणार यशस्वी सखींचा गौरव
अमरावती : स्त्रीशक्तीचे कार्य-कर्तृत्व अतुलनीय आहे. स्त्रीशक्ती म्हणजे स्त्रीत्व आणि अस्तित्व जपणारा एक प्रवाह. या प्रवाहात अनेकींना दिशा सापडली आहे. अशा स्त्रियांची दखल घ्यावी आणि त्यांना त्यांचे स्थान, सन्मान व अभिमानाची जाणीव करून घ्यावी यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत यशस्वी महिलांचा लोकमतद्वारे आज गौरव करण्यात येणार आहे.
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या व कर्तृत्वात त्यांच्यापेक्षा काकणभर सरस ठरणाऱ्या महिलांचा गौरव करणारा हा सोहळा खास महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील ध्येयवेड्या सेवाव्रतींचा सन्मान करून त्यांना मानाचा मुजरा करण्याचे ‘लोकमत’ने ठरविले आहे. सामाजिक शौर्य, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, पत्रकारिता, व्यावसायिक, औद्योगिक, सांस्कृतिक, साहित्यिक, जीवनगौरव या प्रकारांमध्ये निवडक महिलांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षकांनी निवडलेल्या महिलांचा एक शानदार समारंभात गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाइी हॉटेल मेहफिल ईन व के.के. कॅम्ब्रीज यांचे विशेष योगदान लाभले आहे.