चांदूर रेल्वेत शिवसेनेकडून प्रशासनाचा निषेध, आंदोलनाचा इशारा
चांदूर रेल्वे : शहरातील बायपासवर असलेल्या मोठ्या खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेनेतर्फे आगळे-वेगळे आंदोलन करण्यात आले. या खड्ड्यांमध्ये हार, फुले टाकून पूजन केल्यानंतर प्रशासनाचे शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तत्काळ खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारासुद्धा देण्यात आला.
चांदूर रेल्वे शहरात वकील लाईनच्या रस्त्याने व पुढे वळणावर बायपास रोडवर तसेच पंप हाऊसजवळ मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच या खड्ड्यांमध्ये पाणी साचून घाणीचे साम्राज्यसुद्धा पसरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे या खड्ड्यांचे पूजन व आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधसुद्धा व्यक्त करण्यात आला. तत्काळ खड्डे न बुजविल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर, किशोर यादव, प्रणव बोके, रोशन खंडार, मुकेश मेश्राम, संदीप जरे, सारंग भोंडे, अमोल गजभिये, शुभम देशमुख, अनुज पोलाड यांनी सहभाग घेतला.
200921\1545img-20210920-wa0024.jpg
photo