वरली-मटका, जुगारवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:12 IST2021-04-05T04:12:07+5:302021-04-05T04:12:07+5:30

अमरावती : शहर पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणच्या वरली-मटका आणि जुगार अड्ड्यावर धाडी टाकून आरोपींच्या ताब्यातील साहित्य जप्त केले. फ्रेजरपुरा ...

Worli-Matka, Dhadasatra on gambling | वरली-मटका, जुगारवर धाडसत्र

वरली-मटका, जुगारवर धाडसत्र

अमरावती : शहर पोलिसांनी शनिवारी विविध ठिकाणच्या वरली-मटका आणि जुगार अड्ड्यावर धाडी टाकून आरोपींच्या ताब्यातील साहित्य जप्त केले.

फ्रेजरपुरा पोलिसांनी यशोदानगरातील जुगारावर धाड टाकून अजय गणेश सांडे, धीरज प्रमोद गेडाम, सिध्दार्थ रामदास धारगावे, शुभम भीमराव रामटेके यांच्याकडून १४ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गाडगेनगर पोलिसांनी द्वारकानगरातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून शेख नासिर वल्द शेख यासीन याच्याकडून ७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नागपुरी गेट पोलिसांनी गवळीपुऱ्यातील ॲकेडमिक शाळेच्या प्रांगणातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून शहाजोद्दीन अब्दुल हमिद अन्सारी, शेख जमिर शेख आमद यांच्याकडून १ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

-------------------------------------------------------

मटका कुल्पी विक्रेत्यावर गुन्हा

अमरावती : तोंडाला मास्क न लावता मटका कुल्पी विक्रेत्याविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी संचारबंदी उल्लंघनाचा गुन्हा नोंदविला.

दीपक श्रीराम किलोर ९४८ रा. महेंद्र कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक मनीषा सामटकर यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना कुल्पी विक्रेता मास्क न लावता व्यवसाय करताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

Web Title: Worli-Matka, Dhadasatra on gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.