'रुप पालटू शिक्षणाचे' या विषयावर कार्यशाळा

By Admin | Updated: June 20, 2016 00:06 IST2016-06-20T00:06:07+5:302016-06-20T00:06:07+5:30

२१ व्या शतकातील नवीन आव्हाने विद्यार्थ्यांना पेलता यावी, यासाठी आहे त्या शिक्षण पद्धतीत आणखी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून....

Workshop on "Transformational Education" | 'रुप पालटू शिक्षणाचे' या विषयावर कार्यशाळा

'रुप पालटू शिक्षणाचे' या विषयावर कार्यशाळा

तज्ज्ञांनी केले शिक्षकांना मार्गदर्शन : विदर्भातून शिक्षक दाखल
अमरावती : २१ व्या शतकातील नवीन आव्हाने विद्यार्थ्यांना पेलता यावी, यासाठी आहे त्या शिक्षण पद्धतीत आणखी नावीन्यपूर्ण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्याचा सामूहिक प्रयोग व प्रयत्न करण्याच्या दिशेने पाऊल उचलणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात प्रयोगशील शाळा करण्याच्या उद्देशाने येथील गर्ल्स हायस्कूल कॅम्पजवळील शाश्वत कन्सेप्ट स्कूलमध्ये तज्ज्ञांना बोलावून त्यांची कार्यशाळा १६ ते १९ जूनदरम्यान विनामूल्य घेण्यात आली.
शिक्षण म्हणजे काय ? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? शिक्षणाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो आदी प्रश्नांबाबत मात्र ते अनभिज्ञ दिसून येते. पालकांच्या अवास्तव अपेक्षा, पुस्तके, ट्युशन व होमवर्क यामुळे ते प्रचंड तणावात असतात.
आजच गरज आहे ती हसत खेळत बुद्धिविकास व आनंददायी शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्याची, बदलत्या काळानुरुप भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलण्याची क्षमता निर्माण करण्याची, त्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव देण्याची, आजच्या स्पर्धेच्या युगात आपले अव्वल स्थान प्राप्त करण्याची, त्यासाठी विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, स्मरणशक्ती, बहुदश, एकदश विचार, मूल्यमापन, प्रयोगशीलता, निरीक्षण व स्वयंअध्ययन यावर अधिक भर देण्याची गरज आहे.
आनंददायी बहुपयोगी शिक्षण कसे असावे, यासाठी विदर्भातून आलेल्या शिक्षकांना पत्रकार विजय फणसेकर, जागतिक मोटीव्हेशनल ट्रेनर सुधीर मोरे, कॅन्सरतज्ज्ञ अतुल यादगिरे, शाळेचे संचालक तथा आर्किटेक्ट अतुल गायगोले, शाश्वत कन्सेप्ट स्कूलच्या संचालिका अमृता गायगोले आदींनी तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. सुधीर मोरे यांनी जीवन कसे जगावे यासंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन केले. अतुल यादगिरे यांनी अनेक यशस्वी लोकांचे दाखले देऊन जीवनात कसे आनंदी व्हायचे व आरोग्य कसे जपायचे यासंदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. विजय फणसीकर यांनीही शिक्षकांना वक्तव्यशैलीने मंत्रमुग्ध केले. या कार्यशाळेत जीवनाचे ध्येय व उद्देश यांचा शोध घेणे, आंतरिक शिक्षण, थेअरी व प्रॅक्टिकल यांचा समन्वय, वर्ग नियोजन सीसीई, डीआरए-२ वैशिष्ट्यपूर्ण फिनलँड स्कूल मॉडेलची ओळख, विषयाचे एकत्रिकरण व आकलन करणे, तसेच २१व्या शतकातील तांत्रिक व शैक्षणिक आव्हाने इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर तज्ज्ञांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. नावीन्यपूर्ण बदलाची क्षमता बाळगणाऱ्या प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ही कार्यशाळा नक्कीच टर्निंग पॉईट ठरली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Workshop on "Transformational Education"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.