जिल्हा परिषदेत सुट्टीच्या दिवशी कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST2021-09-19T04:13:37+5:302021-09-19T04:13:37+5:30
अमरावती : राज्य विधिमंडळाचे पंचायतराज समिती ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहे. जिल्हा परिषदेला विविध ...

जिल्हा परिषदेत सुट्टीच्या दिवशी कामकाज
अमरावती : राज्य विधिमंडळाचे पंचायतराज समिती ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहे. जिल्हा परिषदेला विविध विकासकामांची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी जिल्हा परिषदेत लगबग दिसून आली.
महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायतराज समिती बहुप्रतीक्षेनंतर तीन दिवस अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. या दरम्यान ही समिती जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शासकीय दवाखाने, अंगणवाडी, शाळा, पशुसंवर्धन दवाखाने तसेच विविध विकासकामांना भेटी देणार आहे. यासंदर्भात प्रश्नावलीनुसार पीआरसीने जिल्हा परिषद प्रशासनाला काही माहिती मागविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सध्या बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. शनिवार, १८ व रविवार १९ सप्टेंबर या दोन दिवसाच्या शासकीय सुटीच्या दिवशीही मिनीमंत्रालयाची बहुतांश विभाग अधिकारी व कर्मचारी प्रशासकीय कामकाजासाठी सायंकाळपर्यंत ठाण मांडून बसले होते. परिणामी सुटीच्या दिवशीही जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसून आली. पीआरसीने मागविलेली माहिती वेळेत उपलब्ध व्हावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध विभागप्रमुखांना दिल्या आहेत.