वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST2021-03-29T04:07:59+5:302021-03-29T04:07:59+5:30
भाजप संतप्त, चक्काजाम आंदोलन, तहसीलदारांची मध्यस्थी पुसला : अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ चे काम दोन वर्षांपासून काम ...

वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण
भाजप संतप्त, चक्काजाम आंदोलन, तहसीलदारांची मध्यस्थी
पुसला : अमरावती पांढुर्णा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ चे काम दोन वर्षांपासून काम बंद आहे. वरुड ते पुसला मार्गावरील अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. पुसलालगत रस्ता व नाल्या अर्धवट असल्याने अनेकांना अपंगत्व आले. त्यामुळे सदर अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा यासाठी २४ मार्च रोजी पुसला भाजपच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार व ठाणेदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मध्यप्रदेशाकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.
सदर रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच पुसला येथे गतिरोधक लावण्यात यावे, अशी मागणी पुसला येथील भाजपचे इंद्रभूषण सोंडे, राजेंद्र केदार, उमेश गेटमे, अमित खेरडे, कृष्णा वाकडे, विलास पवार, अजाब बोदड, स्वप्निल मांडळे, आकाश गजबे, गजानन सोंडे, हितेश तडस, नीलेश फुटाणे, सुभाष कुयटे, ज्योती कुकडे यांनी केली. यावेळी तहसीलदार किशोर गावंडे, शेंदूरजनाघाटचे ठाणेदार श्रीराम गेडाम यांनी मध्यस्थी करून महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंत्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतले.
----------------