‘त्या’उद्यानाचे काम तूर्तास बंद
By Admin | Updated: June 8, 2016 00:01 IST2016-06-08T00:01:57+5:302016-06-08T00:01:57+5:30
छत्री तलाव मार्गावरील उत्तमराव पाटील उद्यानाला वन्यप्रेमींचा विरोध झाल्याने या उद्यानाचे काम तुर्तास बंद करण्यात आले आहे.

‘त्या’उद्यानाचे काम तूर्तास बंद
अमरावती : छत्री तलाव मार्गावरील उत्तमराव पाटील उद्यानाला वन्यप्रेमींचा विरोध झाल्याने या उद्यानाचे काम तुर्तास बंद करण्यात आले आहे. त्यामुळे वन्यप्रेमी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
छत्री तलाव हाच वन्यप्राण्यांसाठी मुख्य जलस्त्रोत आहे. जंगलातील वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी तलावावर येतात. मात्र, छत्री तलावालगतच उद्यानाचे काम सुरु झाले असून उद्यानाच्या तारेच्या कुंपणात अडकून वन्यप्रेमी मृत्यूमुखी पडत आहेत. मागील काही दिवसांत दोन वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला तर तीन ते चार वन्यपशू जखमी झाल्याचे उघडकीस आले. हे उद्यान वन्यप्राण्यांसाठी धोकादायक असल्याचा आरोप वन्यप्रेमींनी केला आहे. नागरिकांनी देखील उद्यानाला विरोध दर्शविल्याने सामाजिक वनिकरण, वनविभागासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन्यप्रेमींनी पालकमंत्र्यांकडेही दाद मागितली. त्यांनीही प्रतिसाद देत वनअधिकाऱ्यांशी चर्चा करून सूचना दिल्या आहेत. आ.सुनील देशमुख यांनीही निर्माणधिन उद्यानाची पाहणी करून काम बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाने उद्यानाचे कार्य तुर्तास बंद केले आहे. (प्रतिनिधी)