पारधी बेड्यावर सुरु आहे विद्यादानाचे कार्य
By Admin | Updated: September 4, 2014 23:26 IST2014-09-04T23:26:53+5:302014-09-04T23:26:53+5:30
कोणत्याही सुख सुविधा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान फिरणारा समाज. साधे दळण-वळणाची साधनेही नाही. अशा गावात ‘‘विद्या दान हेच श्रेष्ठ दान’’ हा आदर्श डोळ्या समोर ठेवून वडुरा पारधी

पारधी बेड्यावर सुरु आहे विद्यादानाचे कार्य
चिखलातून फुलविले जाते कमळ : विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पाठविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन
संजय जेवडे - नांदगाव खंडेश्वर
कोणत्याही सुख सुविधा नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी रानोरान फिरणारा समाज. साधे दळण-वळणाची साधनेही नाही. अशा गावात ‘‘विद्या दान हेच श्रेष्ठ दान’’ हा आदर्श डोळ्या समोर ठेवून वडुरा पारधी बेड्यावरील चिमुकल्याच्या झोळीत विद्यादानाचे महान कार्य जिव्हाळ्याने करुन जणू चिखलातून कमळ फुलविणारे शिक्षक पाहिले की, अभिमानाने उर भरुन आल्याशिवाय राहणार नाही.
ही कहाणी आहे नांदगाव खंडेश्वर पासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर असेल्या वडुरा येथील पारधी बेड्यावरील जिल्हा परिषद शाळेची. या बेड्याची लोकसंख्या १६० असून सुमारे ३० घरे आहेत. या शाळेतून वर्ग १ ते ४ करिता २० विद्यार्थी विद्यादानाचे धडे घेतात. या दुर्गम भागातील शाळेवर मोहन पोकळे व संमिता सोळंके हे दोन शिक्षक विद्यादानाचे कार्य अगदी जिव्हाळ्याने करतात. हे कार्य करीत असताना त्यांनी कथन केलेले अनुभव. सुरुवातीला पालक मेळावा घेऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांना वेळेवर पाठवावे म्हणून मार्गदर्शन केले.
विद्यार्थी स्वच्छ राहत नव्हते त्यांना आंघोळीचे महत्व पटवून दिले. गंध, पावडर, सुई-दोरा हा उपक्रम राबविला, टुथ पेस्ट व ब्रश आणि रुमालचे स्व खर्चाने वाटप केले. लोक वर्गणीतून दहा हजार रुपये गोळा करुन शाळेला साऊंड सिस्टीम उपलब्ध केली.