राजापेठ उड्डाणपुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 00:39 IST2018-12-10T00:38:27+5:302018-12-10T00:39:05+5:30
राजापेठ उड्डाणपुलाचे बांधकाम दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

राजापेठ उड्डाणपुलाचे काम रखडले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राजापेठ उड्डाणपुलाचे बांधकाम दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणामुळे रखडले आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या अखत्यारीतील राजापेठ उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले. परंत,ु रेल्वे रुळावरील काम केवळ पिल्लरवरच थांबले आहे. चार हजार कोटी रुपयांच्या या उड्डाणपुलाचे कंत्राट नागपूर येथील कंत्राटदाराला दिले आहे. २४ महिन्यांत सदर काम पूर्ण करण्याचे बंधनकारक होते. मात्र, अद्याप वर्षभर पुरेल एवढे काम शिल्लक आहे. रेल्वे रुळाखालून अंडरपास करण्यासाठी सिमेंटचे ४४ ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. राजापेठ बाजूला तीन पिल्लर आणि रुळाच्या पलीकडे ३ पिल्लर अशा ६ पिल्लरच्या मधातील परिसर रेल्वे विभागाच्या मालकीचा आहे. कंवरनगरकडे जाणारा उड्डाणपूल पूर्णत: तयार झाला असून, त्यावर पथदिवे लावण्यासाठी १४ लोखंडी खांब लावण्यात आलेले आहेत. उड्डाणपुलावर प्रचंड वजनाचे रोड रोलर उभे असताना त्यावरच लोखंडी पाण्याची टाकी उभी केली जात आहे.
दीड वर्षांपूर्वी सुरू झालेले हे काम अजूनही वर्षभर पुरणार आहे. संथगतीने काम होत असल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. राजापेठ येथून विविध कॉलनी, नगरात जाण्यास सोयीचे जात असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ राहते. त्यामुळे नागरिकांना नवाथेनगरातून फेऱ्याने ये-जा करावी लागत आहे.
रुळाच्या खालून बॉक्स टाकण्याचे काम सुरू होईल. त्याकरिता चार तास रेल्वे वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. डिसेंबरअखेर उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वास जाईल.
- सुनील वासेकर, सेक्शन इंजिनीअर, रेल्वे विभाग बडनेरा
राजापेठ येथे रेल्वे रुळाखालील अंडरपाससाठी निर्माण केलेल्या सिमेंटच्या बॉक्समुळे जागा व्यापली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाचे काम तूर्तास बंद आहे.
- सुहास चव्हाण, उपअभियंता बांधकाम विभाग
महापालिका