अखेर बंद पडलेल्या देवडी रस्त्याच्या कामास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:06+5:302021-04-12T04:12:06+5:30
लोकमत इम्पॅक्ट अचलपूर : येथील देवडी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. तेथील काम अनेक दिवसांपासून बंद आहे. ...

अखेर बंद पडलेल्या देवडी रस्त्याच्या कामास सुरुवात
लोकमत इम्पॅक्ट
अचलपूर : येथील देवडी रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली आहे. तेथील काम अनेक दिवसांपासून बंद आहे. रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे नागरिक, दुकानदारांना त्रास या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच पालिका प्रशासन खळबळून जागे झाले व शेवटी अर्धवट राहिलेल्या डांबरीकरणास शनिवारपासून सुरुवात करण्यात आली.
अचलपूर नगर परिषद हद्दीतील टक्कर चौक ते देवडी, ईदगाहपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे ९५ लाखांच्या कामास होळी अगोदर सुरुवात करण्यात आली. मात्र, होळीच्या दोन दिवस अगोदरपासून डांबरीकरण, खडीकरणाचे काम तसेच पडून होते. देवडी येथील दुकानासमोर गिट्टी टाकण्यात आली होती. टक्कर चौक ते पोलीस स्टेशन चौकापर्यंत बारीक गिट्टी टाकण्यात आली होती. मात्र, काम बंद होते. त्यामुळे या गिट्टीवरून दुचाकीस्वार पडून जखमी होत होते. ठेकेदाराकडून कासवगतीने काम होत असल्यामुळे याचा मोठा फटका देवडी येथील दुकानदारांना बसला आहे.
--------