दापोरी येथील पुलाचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:03+5:302021-07-27T04:13:03+5:30

फोटो - मोर्शी २६ पी मोर्शी : एक वर्षापासून सुरू असलेल्या दापोरी-सालबर्डी रस्त्याच्या बांधकामात सर्रास मातीचा वापर केला जात ...

The work of the bridge at Dapori is inferior | दापोरी येथील पुलाचे काम निकृष्ट

दापोरी येथील पुलाचे काम निकृष्ट

फोटो - मोर्शी २६ पी

मोर्शी : एक वर्षापासून सुरू असलेल्या दापोरी-सालबर्डी रस्त्याच्या बांधकामात सर्रास मातीचा वापर केला जात असून, या वर्दळीच्या रस्त्यावरील पूल ढासळून मोठा अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

दापोरी-सालबर्डी रस्ता हा प्रसिद्ध पर्यटन व तीर्थक्षेत्र सालबर्डीला जोडलेला असून, महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील हजारोच्या संख्येने भाविक भक्तगण लहान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी याच मार्गाने जातात. दापोरी येथील नवीन पूल उभारण्याचे काम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात काँक्रीट भिंत न टाकता मातीचे पोते भरून मातीची भिंत उभी करण्यात आली. हा पूल केव्हाही ढासळून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दापोरी-सालबर्डी, पाळा-मोर्शी या रस्त्याच्या कामाचे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी मूल्यमापन करून संबंधितावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रूपेश वाळकेसह ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: The work of the bridge at Dapori is inferior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.