शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

शासनाचा शब्दच्छल, ७९ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:22 IST

शासनाने महिण्याभऱ्याच्या अंतरात दोन वेळा बोंडअळीने ३३ टक्कयावर बाधित क्षेत्राला आवश्यक मदतनिधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला मागितला.

ठळक मुद्देबोंडअळीने नुकसान : मंडळनिहाय अहवालात पाच तालुक्यांना वगळले

गजानन मोहोड ।आॅनलाईन लोकमतअमरावती : शासनाने महिण्याभऱ्याच्या अंतरात दोन वेळा बोंडअळीने ३३ टक्कयावर बाधित क्षेत्राला आवश्यक मदतनिधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला मागितला. मात्र दुसरा अहवालात शब्द फिरवून मंडळनिहाय अहवाल मागितल्याने पाच तालुक्याला त्याचा सरळ फटका आहे. उर्वरित ९ तालुक्याला ७९ कोटींची मदत कमी मिळणार आहे. त्यामुळे ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय केवळ फार्स ठरणार आहे. मदतीच्या नावावर शासनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केल्याचे वास्तव आहे.शासनाच्या ७ डिसेंबरचे आदेशान्वये जिल्ह्यात बोंडअळीमुळे ३३ टक्कयांवर बाधित क्षेत्राचे संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात १८३ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला. आता १७ फेब्रुवारीला महसूल विभागाने पीक कापणी प्रयोगानंतर मंडळनिहाय अहवाल मागविला. यामध्ये १०२ कोटींचे नुकसान दाखविण्यात आले. शासनाचे उपसचिव सु.ह.उमरानीकर यांनी ७ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून ३३ टक्कयांवर बाधित कपाशीचा संयुक्त स्वाक्षरीसह शेतकऱ्यांना मदतीसाठी आवश्यक निधीचा अहवाल मागितला. यासाठी बाधित पिकांत शेतकरी उभा असलेले ‘जीपीएस’ इनबिल्ट फोटो मोबाइल अ‍ॅपच्या सहाय्याने काढण्यात आले. यामध्ये २,२१,४१५ शेतकऱ्यांच्या २,२२,५८६ हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी १,९९,१७२ हेक्टरमधील कपाशी बाधित झाले असल्याचे निष्पन्न झाले. या क्षेत्रासाठी १८२ कोटी ६० लाख तीन हजार ४९३ रूपयांची मागणी शासनाकडे केली. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असताना १७ फेब्रुवारीला महसूल विभागाने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. पीक विमा योजनेतंर्गत कपाशीचे पीक कापणी प्रयोगाअंती ३३ टक्कयांवर बाधित मंडळाची संख्या निश्चित झाल्याने त्या सबंधित क्षेत्रात दोन हेक्टर मर्यादेत मदत देण्यासाठी अहवाल मागितला. त्यानुसार जिल्ह्यप्रशासनाने ४६ महसूल मंडळात १,१९,४१० शेतकºयांच्या १,१०,९०० हेक्टर क्षेत्रात ३३ टक्कयांवर नुकसान झाल्याने १०३ कोटी ६४ लाख दोन हजार ५९० रूपयांच्या निधीची मागणी केली. पहिल्या अहवालाच्या तुलनेत दुसऱ्या अहवालात ७८ कोटी ९६ लाखांची तफावत असल्याने या निधीचा फटका केवळ शासनाचे शब्दच्छलामुळे बसणार असल्याचे वास्तव आहे.४५ महसूल मंडळांना वगळलेशासनाला जानेवारीत पाठविण्यात आलेल्या बोंड अळीने बाधित क्षेत्राचा पहिल्या अहवालात चौदाही तालुक्यातील ३३ टक्कयांवर बाधित कपाशीचे क्षेत्राचा समावेश होता. मात्र आता पीक कापणी प्रयोगांअंती दुसरा अहवाल शासनाने मागविला .यात अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे, दर्यापूर व धारणी तालुक्यातील ४५ महसूल मंडळाचे उत्पन्न जास्त दाखविण्यात आल्याने वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरीही ते भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.पाऊस, गारपिटीने ६५ कोटींचे नुकसान५९ हजार शेतकºयांचे ४८ हजार हेक्टर बाधितअमरावती : मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे ५९,०४७ शेतकºयांच्या ४८,७७६ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ६३.४५ कोटींचे नुकसान झाले आहे . ११ व १३ फेब्रूवारीला ११ तालुक्यात ५३२ गावांमध्ये ४५,०७० हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला. १२ फेब्रुवारीला महसूल विभागाच्या उपसचिवांनी पत्र देवून तीन दिवसाच्या आत संयुक्त अहवाल मागविला होता. क्षेत्रिय कर्मचाऱ्यांकडून प्राप्त अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी उशीरा शासनाला सादर केला. गारपीट व अवकाळी पावसामुळे ३३ ते ५० टक्कयांपर्यत १७,४०६ शेतकºयांच्या १२००८ हेक्टरमधील जिरायती व बागायती पिकांचे १४ कोटी ६४ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या आपत्तीमध्ये ४१ हजार ६३४ शेतकºयांचे ३६ हजार ७६८ हेक्टरमधील पिकांचे ५० टक्कयांवर नुकसान झाले आहे.यासाठी ४८ कोटी ८८ लाख ३९ हजार ४४२ रूपयांच्या मदतीची आवश्यकता आहे.