‘गोल्डन गँग’ शब्द प्रयोगाने गदारोळ

By Admin | Updated: March 21, 2015 01:02 IST2015-03-21T01:02:52+5:302015-03-21T01:02:52+5:30

काँग्रेसच्या अरूण जयस्वाल यांनी महापालिका सभागृहात ‘गोल्डन गँग’ असा नामोल्लेख केला.

The word 'golden gang' | ‘गोल्डन गँग’ शब्द प्रयोगाने गदारोळ

‘गोल्डन गँग’ शब्द प्रयोगाने गदारोळ

मुद्दा सांस्कृतिक भवनाचा : काँग्रेसचे अरूण जयस्वाल नाराज
अमरावती :
काँग्रेसच्या अरूण जयस्वाल यांनी महापालिका सभागृहात ‘गोल्डन गँग’ असा नामोल्लेख केला. त्यावर आक्रमक होत बसपाचे गोंडाणे यांनी ‘गोल्डन गँग’ कोण? याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. यामुळे महापालिका सभागृहात शुक्रवारी ताणातुणीचे वातावरण निर्माण झाले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात करारनाम्याच्या अटी-शर्तींचे पालन होत नसल्याचा आरोप करुन कंत्राटदाराला ३० वर्षांची मुदतवाढ देण्याचा प्रकार म्हणजे ‘फिक्सिंग’ आहे. विकासकामांना २ कोटी ६५ लाख रुपये देण्यास कितीही विरोध केला तरी ‘गोल्डन गँग’ हा विषय मंजूर करणारच, असे काँग्रेसचे अरुण जयस्वाल म्हणाले. त्यावर बसपचे अजय गोंडाणे आक्रमक झाले. अखेर स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले यांनी हस्तक्षेप करून एकेरी भाषेचा वापर टाळण्याचा सल्ला सदस्यांना दिला.
महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शुक्रवारी सर्वसाधारण सभा पीठासीन सभापती महापौर चरणजितकौर नंदा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपायुक्त विनायक औगड, नगरसचिव मदन तांबेकर यांनी सहभाग नोंदविला. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीला मंजुरी देण्याच्या विषयाला प्रारंभी काँग्रेसचे सदस्य वसंतराव साऊरकर, अरुण जयस्वाल, अमोल ठाकरे, अ.रफिक, मुस्लिम लिगचे इमरान अशरफी यांनी कडाडून विरोध नोंदविला. जयस्वाल यांनी सांस्कृतिक भवनाच्या करारनाम्याची प्रत सभागृहात झळकविली.

सांस्कृतिक भवनाच्या दुरूस्तीसाठी २ कोटी ६५ लाख रुपये देणे नियमबाह्य आहे. करारनाम्यात अशा कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. मात्र, अपहार करण्यासाठीच सांस्कृतिक भवनाच्या कंत्राटाला मुदतवाढ दिली जात आहे. महापालिकेत विशिष्ट काही जण भूखंड वाटप, कंत्राट ठरवीत आहेत.
- अरुण जयस्वाल, नगरसेवक.

Web Title: The word 'golden gang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.