महिला सुरक्षा यंत्र ई-शेतीची प्रात्याक्षिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:28+5:30
पंचायत समिती, विज्ञान अध्यापक मंडळ, तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षण विभाग यांच्यावतीने तालुकास्तरीय दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे सोमवारी पंचायत समिती सभापती महादेव समोसे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रियंका दगडकर होत्या.

महिला सुरक्षा यंत्र ई-शेतीची प्रात्याक्षिके
धामणगाव रेल्वे : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची निमित्ताने स्थानिक स्कूल ऑफ स्कॉलरमध्ये वैज्ञानिकांचा मेळा भरला आहे. शाश्वत शेती पद्धत, ई-शेती, महिला सुरक्षा यंत्र, साबण निर्मिती, बहुगुणी आवळा, स्मार्ट बँक अशा एकापेक्षा एक सरस प्रतिकृती येथे पाहायला मिळत आहेत.
पंचायत समिती, विज्ञान अध्यापक मंडळ, तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षण विभाग यांच्यावतीने तालुकास्तरीय दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे सोमवारी पंचायत समिती सभापती महादेव समोसे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रियंका दगडकर होत्या. जिल्हा परिषद सदस्य वैशाली बोरकर, अनिता मेश्राम, उपसभापती माधुरी दुधे, गटशिक्षणाधिकारी सुषमा मेटकर, पंचायत समिती सदस्य शुभम भोंगे, जयश्री सेलोकर, बेबी उईके, नरेंद्र रामावत, राजू केला, विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष अनंत डुंबरे, प्राचार्य भैरोबा मुंजाळ, अमरावती येथील एसओएसचे प्राचार्य सुरेश लकडे, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष मिलिंद देशमुख, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र गायकवाड, सिद्धार्थ हेंडवे, अर्चना राऊत, संजय शिरभाते, अविनाश चापले यांची उपस्थिती होती. तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तसेच खाजगी शाळांच्या ‘अ’ गटामधून ८० प्रतिकृती सहभागी करण्यात आल्या. ‘ब’ गटात ३२ प्रतिकृतींचा समावेश आहे.
‘लोकमत’ची ई-शेती
किसान दिनानिमित्त ‘लोकमत’ने प्रकाशित केलेले लेख येथे प्रतिकृती म्हणून प्रदर्शनात पाहायला मिळाले. ई-शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, नवे तंत्रज्ञान, शेतमालाचे विपणन अशी विशेष माहिती स्कूल ऑफ स्कालर्सच्या असित बागडे या विद्यार्थ्यांने प्रदर्शनात मांडली. घरगुती प्रदूषण व चिमणी, सोलर प्लँट, पॉवर सेव्हिंग, मॅजिक चेअर, वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण, आधुनिक सुधारित गाडी, हवेच्या दाबावर उडणारे कारंजे, सूर्यकिरण चिकित्सा अशाा प्रतिकृती येथील विज्ञान प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत.