शासकीय कांदा खरेदी केंद्रासाठी महिला रस्त्यावर

By Admin | Updated: May 17, 2016 00:04 IST2016-05-17T00:04:27+5:302016-05-17T00:04:27+5:30

सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव नसल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

Women's Road to Government Onion Shopping Center | शासकीय कांदा खरेदी केंद्रासाठी महिला रस्त्यावर

शासकीय कांदा खरेदी केंद्रासाठी महिला रस्त्यावर

आरडीसींना निवेदन : शेतकरी संघटना महिला आघाडीची मागणी
अमरावती : सध्या जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव नसल्याने मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कांदा खरेदी साठी शासकीय केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्यावतीने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यंदा कांदा उत्पादकांनी परिश्रमाने पीक काढले. मात्र कांद्यासाठी त्याने केलेले श्रम आणि खर्च लक्षात घेता कांद्याला भाव अल्प असल्याने छदामही वसूल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे. अशातच कांदाचे भाव वाढताच शासनाच्या वतीने कांदा जीवनावश्यक यादीमध्ये टाकण्यात येतो. शिवाय कांदा निर्यातीचा निर्णयही तातडीने घेवून भाव पाडण्यात येतो, असा आरोप शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीने केला आहे. त्यामुळे यंदा कांदा पिकांचा खर्चही वसूल होण्याची शक्यता फारच कमी आहे. शासनाने त्वरित शासकीय कांदा खरेदी केंद्र सुरू करावे. दुष्काळामुळे शेतकरी अधिकच अडचणीत आहेत. यातून बाहेर काढण्यासाठीनव्याने कर्जाचे वाटप करावे आणि आधार द्यावा याशिवाय शेतकऱ्याला कर्ज माफी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटना महिला आघाडीच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. यावेळीे निलिमा शेरेवार, रजनी दातीर, सुनीता सुने, मनीषा सुने, प्रतिभा गादे, संजीवनी आगरकर, उमा भोयर, शोभा पेटले बोंडे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Women's Road to Government Onion Shopping Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.