अमरावती तहसील कार्यालवर महिलांचा मोर्चा

By Admin | Updated: January 6, 2015 22:52 IST2015-01-06T22:52:49+5:302015-01-06T22:52:49+5:30

स्थानिक तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील गोंधळाविरोधात मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वात महिलांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.

Women's Front on Amravati Tehsil Office | अमरावती तहसील कार्यालवर महिलांचा मोर्चा

अमरावती तहसील कार्यालवर महिलांचा मोर्चा

अमरावती : स्थानिक तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील गोंधळाविरोधात मंगळवारी युवा स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वात महिलांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांनी त्यांच्या समस्या ऐकून घेतल्यात.
तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटुंब कल्याण आदी योजनांच्या अनेक लाभार्थ्यांची प्रकरणे तहसील कार्यालयात पडून आहेत. याबाबत शहरातील व तालुक्यातील अनेक लाभार्थी चौकशीसाठी तहसील कार्यालयात येतात. मात्र येथील तहसीलदार व्ही.डी. पाटील हे नागरिकांना असभ्य वर्तणूक देतात. त्यामुळे बाहेर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांच्या शंकेचे निराकरण या अधिकाऱ्यांकडून होऊ शकत नाही. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी तसेच वरील योजनांमधील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावी, अशी मागणी एसडीओ निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी संजय हिंगासपुरे, सुमती ढोक, अरुण चचाणे, लता अंबुलकर, शालिनी देवरे, कमल शिंगणजुडे, वंदना जामनेकर, प्रतिभा पाटील, ज्योती दुर्गे, निर्मला कचरे, रहिसा परवीन, शोभा किटके, अनुराधा लाहे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Women's Front on Amravati Tehsil Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.