युवतींची गाडी सुसाट!
By Admin | Updated: January 23, 2015 00:50 IST2015-01-23T00:50:52+5:302015-01-23T00:50:52+5:30
स्त्री म्हटली की, हळुवार, कोमल, नाजूक-साजूक अशा उपमा डोळ्यांसमोर येतात. किंबहुना याच उपमा तिला दिल्या जातात.

युवतींची गाडी सुसाट!
अमरावती : स्त्री म्हटली की, हळुवार, कोमल, नाजूक-साजूक अशा उपमा डोळ्यांसमोर येतात. किंबहुना याच उपमा तिला दिल्या जातात. एकविसाव्या शतकातील महिला आणि युवतींनी मात्र स्त्रीला बहाल करण्यात आलेल्या या उपमांच्या जोखडातून केव्हाच सुटका करून घेतली असून, त्यांचा रांगडा, राकट, मर्दानी अवतार आता सर्वत्र दिसू लागला आहे. त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बटण स्टार्ट गाड्यांऐवजी आता महिलांच्या हातात गीअर बाईक्स दिसू लागल्या आहेत.
गीअर बाईक्स चालवणे म्हणजे ताकदीचे व पयार्याने पुरुषांचे काम हा समज त्यामुळे गळून पडला आहे. अमरावतीत महिलांचे गीअर बाईक चालविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पाच वर्षांत बाईक स्वार युवतींची संख्या वाढल्याचे चित्र आहे. अल्पवयीन मुली दुचाकी घेऊन शहरात सर्रास फिरताना आढळतात. वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. त्यात भरीच भर म्हणून बाईक चालविण्याचे युवतींचे वेड घातक ठरु शकते.