महिलांनी नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करावी

By Admin | Updated: September 22, 2015 00:24 IST2015-09-22T00:24:01+5:302015-09-22T00:24:01+5:30

भयगंड सोडून स्त्रीने तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे, असा सल्ला महिला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका अश्विनी पारळकर यांनी दिला.

Women should make friendship with new technology | महिलांनी नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करावी

महिलांनी नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करावी

अश्विनी पारळकर : प्रशिक्षितांना प्रमाणपत्र
अमरावती : भयगंड सोडून स्त्रीने तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे, असा सल्ला महिला महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका अश्विनी पारळकर यांनी दिला. रायसोनी ग्रुप व लोकमत सखीमंचच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या संगणक प्रशिक्षण उपक्रमांतर्गत संगणकाचे पायाभूत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर रायसोनी ग्रुपचे उपाध्यक्ष हेमंत सोनारे व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही. इंगोले उपस्थित होते. प्रास्ताविकातून उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना हेमंत सोनारे यांनी चार भिंतीच्या आत राहून संगणकाकडे तिऱ्हाईतपणे पाहणऱ्या महिलांना संगणक हाताळता यावे. एवढेच नव्हे, तर हल्ली नित्याचे झालेले आॅनलाईन व्यवहार त्यांना घरबसल्या करता यावेत, या हेतूने रायसोनी ग्रुपने महिलांना नि:शुल्करीत्या संगणक साक्षर करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. पी.व्ही. इंगोले यांनी पायाभूत संगणक साक्षर अभ्यासक्रमाच्या पलीकडेही महिलांना संगणकासंदर्भात काही मार्गदर्शनाची गरज भासल्यास रायसोनी महाविद्यालयाकडून दिले जाईल, अशी ग्वाही उपस्थित महिलांना दिली. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षित महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी काही प्रशिक्षित महिलांनी आपले अनुभव व्यक्त केले. संचालन व आभार प्रदर्शन संगणक प्रशिक्षिक पूजा मायंदे यांनी केले.
कार्यक्रमाला जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष मयुरा देशमुख, नगरसेविका सुषमा बर्वे, रामदास पारळकर, सागर देशमुख यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला व रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Women should make friendship with new technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.