शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
4
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
5
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
6
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
7
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
8
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
9
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
10
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
11
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
12
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
13
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
14
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
15
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
16
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
17
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
18
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
19
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
20
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 

अमरावतीच्या उपवनसंरक्षकांवर महिला आरएफओंचे गंभीर आरोप, वन विभागात खळबळ

By गणेश वासनिक | Updated: February 15, 2024 17:44 IST

दीपाली चव्हाण प्रकरणाची आठवण झाली ताजी; राज्याच्या वनबलप्रमुखांसह राज्य महिला आयोगाकडे तक्रार

अमरावती : गत दोन वर्षांपूर्वी मेळघाटच्या हरिसाल येथील आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वनविभागात धरणीकंप झाल्यानंतर आता अमरावतीच्या एका महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने अमरावतीचे उपवनसंरक्षक यांच्यावर तक्रार गंभीर तक्रारीचा बाॅम्ब टाकला आहे. तब्बल दहा पाणी तक्रारीत उपवनसंरक्षकाचे कारणामे उघड केले आहेत. याप्रकरणी राज्याचे वनबल प्रमुख काय ॲक्शन घेतात? याकडे वनविभागाचे लक्ष लागले आहेत.

अमरावतीचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा हे अवघ्या आठ महिन्यापूर्वी पदस्य झालेले असून एका महिला आरएफओने त्यांचेवरगंभीर स्वरुपाचे आरोप केले आहे. मिश्रा यांच्या तुघलकी आणि ‘यूपी राज’ कारणाने संबंधित महिला वनाधिकाऱ्याने तक्रारीत उघड केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अमरावती येथे २१ महिन्यापूर्वी संबंधित महिला आरएफओ पदस्य असून त्यांचा गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी अमरावतीच्या मुख्यवनसंरक्षक जयोती बॅनर्जी यांना भेटून आरएफओंच्या शिष्टमंडळाने तक्रारीची दखल घेऊन उच्चस्तरीय चाैकशी करण्याचा आग्रह धरलेला आहे. डीएफओ मिश्रा यांच्याकडून मिळणारा मानसिक त्रास आणि अपमानास्पद वागणुकीची तक्रार या महिला आरएफओंनी राज्य महिला आयोगाकडे पाठविली आहे.

बंगल्यावर साहित्य पुरवठा करण्याचे फर्मानउपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांच्या बंगल्याची सध्या डागडुजी सुरु असून या बंगल्यावर नियमबाह्य, अंदाजपत्रक मंजूर नसताना लाखो रुपयांची उधळपट्टी केल्या जात आहे. बंगल्यावर फर्निचर, साफसफाई साहित्य, मशरुम गार्डनसाठी साहित्य खरेदी करण्यासाठी उपवनसंरक्षक दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. वडाळीच्या वनविश्राम गृहावर मित्रांकरीता ‘नॉन व्हेज’ जेवण करण्यास सांगितले जाते. जेव्हा शासकीय वनविश्राम गृहात ‘नॉन व्हेज’ निर्बंध असताना एका महिला वनाधिकाऱ्यास भाग पाडले जाते, असे तक्रारीत म्हटले आहे.

वनाधिकाऱ्यांना एकट्याने भेटण्याचा सल्लाउपवनसंरक्षक मिश्रा यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ५ वनपरिक्षेत्र असून दोन वनपरिक्षेत्रात महिला वनाधिकारी कार्यरत आहेत. यापूर्वी एका महिला वन अधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षकाच्या कार्यशैलीवर नाराज होत दीपाली चव्हाण सारखे करण्याची भाषा वापरली होती. तेव्हाउपवनसंरक्षक मिश्रा यांनी सर्वच आरएफओंच्या सर्व्हिस रिव्हाॅवर काढून जमा केल्या होत्या, ही बातमी ‘लोकमत’ने प्रकाशीत केली होती. पाच वनपरिक्षेत्र अधिकारी जेव्हा उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा यांना कामानिमित्य भेटण्यासाठी गेले असता केवळ एकट्याने भेटण्यास यावे असे सांगण्यात आले. त्यामुळे एकट्याने भेटण्याचा आग्रह का? असा गंभीर प्रश्न महिला वनाधिकाऱ्यांनी तक्रारीत नमूद केला आहे.

विमान, हॉस्पिटलचे भाडे दिलेअमरावतीचे उपवनसंरक्षक अमितकुमार मिश्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते जेव्हा त्यांचे लखनऊ येथे गावी जातात. त्या विमानाच्या प्रवासाचे भाडे खर्च करण्यास सांगतात. इतकेच नव्हे तर ते काही दिवसांपूर्वी ते डेंंग्यूमुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात असताना येथील सर्व खर्च तक्रारकर्त्या महिला अधिकाऱ्याने केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अद्यापपर्यंत महिला आरएफओंकडून तक्रार प्राप्त झाली नाही. परंतु,डीएफओ मिश्रा यांच्याविषयी नेमके काय प्रकरण आहे, याची शहानिशा केली जाईल. यातील वास्तविकता जाणून पुढे निर्णय घेण्यात येईल.- शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र