महिला पोलीस अधिकारी बनल्या एक दिवसाच्या ठाणेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:16 IST2021-03-09T04:16:13+5:302021-03-09T04:16:13+5:30
अमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहाही ठाण्यांचा कार्यभार सोमवारी महिला पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आला. ...

महिला पोलीस अधिकारी बनल्या एक दिवसाच्या ठाणेदार
अमरावती : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहाही ठाण्यांचा कार्यभार सोमवारी महिला पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यांनी हा कारभार सक्षमपणे हाताळला. पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
ठाणेदारांनी महिला अधिकाऱ्यांना एक दिवसाचा प्रभार देत त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. गाडगेनगर ठाण्यात पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, फ्रेजरपुरा येथे हेड कॉन्स्टेबल लता ठाकरे, राजापेठ येथे उपनिरीक्षक शीतल निमजे, शहर कोतवाली ठाण्यात उपनिरीक्षक भारती इंगोले, नांदगावपेठ येथे पोलीस निरीक्षक कविता पाटील, भातकुली येथे हेड कॉन्स्टेबल सुवर्णा टेकाडे तसेच वाहतूक शाखेत सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) चा एक दिवसांचा प्रभार नायब पोलीस निरीक्षक रंजना इंगळे यांच्याकडे देण्यात आला. वाहतूक निरीक्षक (पूर्व विभाग) ची जबाबदारी पोलीस हवालदार रूपवती पवार, तर वाहतूक निरीक्षक (पश्चिम विभाग) ची जबाबदारी नायक पोलीस शिपाई जयमाला इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आला.