नराधमांचा महिलांकडून न्यायालयाबाहेर निषेध
By Admin | Updated: June 25, 2014 00:08 IST2014-06-25T00:08:38+5:302014-06-25T00:08:38+5:30
विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेली अंबानगरी हादरुन सोडणाऱ्या विद्यार्थिनीवरील सामूहिक अतिप्रसंगाच्या घटनेने महिला संघटना पेटून उठल्या. या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी कडक पोलीस बंदोबस्तात

नराधमांचा महिलांकडून न्यायालयाबाहेर निषेध
आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी : विद्यार्थिनीवर बलात्कार प्रकरण
अमरावती : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेली अंबानगरी हादरुन सोडणाऱ्या विद्यार्थिनीवरील सामूहिक अतिप्रसंगाच्या घटनेने महिला संघटना पेटून उठल्या. या प्रकरणातील आरोपींना मंगळवारी कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी संतप्त महिलांनी धडा शिकविण्यासाठी आरोपींकडे धाव घेतली. परंतु पोलिसांचे सुरक्षा कवच त्या भेदू शकल्या नाहीत. त्यानंतर न्यायालया बाहेर महिलांनी आरोपींचा तीव्र निषेध केला.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात लक्ष्मीनगरातील २१ वर्षीय तरुणी अमरावतीच्या एका महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहे. १९ जून रोजी ती प्रियकरासह एक्सप्रेस हायवेने घरी जात होती. वाटेत त्यांना सतीश जयस्वाल व रुपेश वडतकर या दोघांनी अडवून मारहाण केली व मुलीवर सामूहिक अतिप्रसंग केला.