महिला सक्षमीकरणाने विकासाचा मार्ग प्रशस्त
By Admin | Updated: September 24, 2014 23:24 IST2014-09-24T23:24:01+5:302014-09-24T23:24:01+5:30
महिला सक्षम झाल्यानंतर विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त होतो हे आपण तमाम महिलांनी गेल्या पाच वर्षांत 'याची देही याची डोळा' अनुभवला आहे. तसेच यासाठी आता परत तुम्हाला आपले कर्तव्य

महिला सक्षमीकरणाने विकासाचा मार्ग प्रशस्त
यशोमती ठाकूर यांचे प्रतिपादन: पिंगळादेवी गडावर महिला मेळावा
अमरावती : महिला सक्षम झाल्यानंतर विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त होतो हे आपण तमाम महिलांनी गेल्या पाच वर्षांत 'याची देही याची डोळा' अनुभवला आहे. तसेच यासाठी आता परत तुम्हाला आपले कर्तव्य पार पाडायच आहे आणि हे आवाहन स्वीकारण्यासाठी महिलांनी परत एकदा सज्ज झाले पाहिजे, असे प्रतिपादन आ. यशोमती ठाकूर यांनी केले.
त्या मोर्शी तालुक्यातील पिंंगळादेवी गडावर नुकत्याच पार पडलेल्या महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलत होत्या. महिला सक्षमिकरण व विकासात महिलांचा वाटा या आशयाच्या महिला मेळाव्यात त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी जि.प. सदस्य चित्रा डहाणे, वर्षा आहाके, विभा देशमुख, माहुली जहांगीरच्या सरपंच ज्योती ठाकरे, सीमा मोरे, ज्योती तोटेवार उपस्थित होत्या.
आमदार यशोमती म्हणाल्या की महिलांनी मनावर घेतले आणि त्याला परिश्रम जिद्द, चिकाटी याची जोड दिली तर महिलासुध्दा विकासाचा किमयागार होऊ शकते. हे शाश्वत सत्य तुम्ही सर्वांनी गेल्या पाच वर्षांत अनुभवल आहे. एकूण मतदारांची संख्या आणि त्यामध्ये महिला मतदाराचा टक्का पहिला तर हा हक्क बजावतांना जागृत राहिल्यास विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरु शकतो हे आता अधोरेखीत झाले आहे. पावसाळ्यात ज्या प्रमाणे भुछत्र्या उगवणे व अल्पावधीतच त्यांचे अस्तित्व नष्ट होणे ही वर्षानुवर्षांची नैसर्गिक प्रक्रिया सर्वांनी पाहिली आहे. नेमकी तीच स्थिती आगामी निवडणुकीत होणार आहे. त्या दृष्टीने विकासभिमुख लोकाभिमुख नेतृत्व किती महत्वाचे असते हे आपणाला माहीत आहे, असे त्यांनी सांगितले.
महिला सक्षमीकरण मेळाव्यात गावागावात महिला बचत गट स्थापन करुन सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या मोर्शी तालुक्यातील २८ गावातील महिला बचत गट अध्यक्षांचा व महिला सरपंच यांच्या भावपूर्ण सत्कार सोहळ्याला अंदाजे २५०० च्या वर महिलांनी उपस्थिती दर्शवून एकप्रकारे आम्हाला ही विकासभिमुख अधोरेखित झाले. मेळाव्याला महिला बचत गट, पदाधिकारी व सदस्य, सरपंच व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिमा मोरे यांनी तर संचालन ज्योती तोटेवार यांनी केले.