शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

 मेळघाट वनविभागातील महिला एसीएफने व्हाॅट्स ॲपवर टाकली सुसाईड नोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2022 21:15 IST

Amravati News ¯ दीपाली चव्हाण आत्महत्या घटनेला जेमतेम वर्ष होत असतानाच मेळघाट वनविभागातील आणखी एका महिला सहाय्यक वनसंरक्षक असलेल्या महिला अधिकाऱ्याने वॉटसअपवर सुसाईड नोट टाकल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देमेळघाट वन आणि व्याघ्र प्रकल्पात खळबळ डिलिटही केली, तणावात चूक झाल्याची कबुली

अमरावती : मेळघाट वन विभागातील सहायक वनसंरक्षक (एसीएफ) पदावर असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे पत्र वन कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या व्हाॅट्स ॲप ग्रुपवर टाकले आणि काही वेळात ते डिलिट करीत, या खळबळजनक कृतीबद्दल माफी मागितली. ज्यांच्याकडे हा मेसेज असेल, त्यांनीसुद्धा तो डिलिट करावा, अशी विनंतीही केली. दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाला एक वर्ष झाले असताना, हा दुसरा प्रकार धक्का देणारा ठरला आहे.

विद्या वसव असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. १० एप्रिल रोजी त्यांनी ‘मेळघाट टेरिटोरियल’ या ग्रुपवर दीड पानाची सुसाईड नोट टाकली आणि वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये एकच भूकंप आला. काही वेळानंतर ते पत्र त्यांनी डिलिट केले. मात्र, त्यापूर्वी अनेकांनी ते वाचले आणि व्हायरलदेखील झाले.

घालून पाडून बोलतात... मुलाची काळजी घ्यावी...

उपवनसंरक्षक गिन्नी सिंग या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे त्यांनी ८ एप्रिल रोजी, रानगव्याने एका आदिवासी इसमाला गंभीर जखमी केल्याची माहिती रात्री साडेदहाच्या सुमारास दिली. त्यानंतर मुलगा मोबाईल खेळत असल्याने मोबाईल स्विच ऑफ झाला. त्यामुळे रात्री या विषयावर संवाद झाला नाही. त्यासंदर्भात माफी मागितली तरीदेखील उपवनसंरक्षक ग्रुपवर घालून-पाडून बोलतात. वारंवार कार्यालयात बोलावून लिपिक, लेखापालासमोर दमदाटी करतात. हा मानसिक त्रास सहन होत नाही. माझ्या चुकीबद्दल फाशीची शिक्षा करून घेत आहे. माझ्या मुलाची काळजी घ्यावी, असे मेळघाट प्रादेशिक वन विभागांतर्गत अंग व धारणीचा पदभार असलेल्या एसीएफ विद्या वसव यांनी पत्रात नमूद केले.

डीएफओची स्तुती

विद्या वसव यांनी, तणावात असल्याने सुसाईड नोट लिहिल्याचे सांगत ती डिलिट केली. डीएफओ मॅडमनी नेहमीच सपोर्ट केला आहे. माझ्याकडून चूक झाली होती. मी माझ्याकडून मागितलेली माहिती वेळेत दिली नाही. वरणगावात जखमी झालेल्या रुग्णाची प्रकृती सध्या चांगली असल्याची पोस्ट त्याच ग्रुपवर करण्यात आली.

दोन्ही महिला अधिकारी सोबत दौऱ्यावर

संपूर्ण घटनाक्रमासंदर्भात उपवनसंरक्षक गिन्नी सिंग आणि सहायक वनसंरक्षक विद्या वसव यांच्याशी संपर्क केला असता, जारिदा येथे दौऱ्यावर या दोन्ही महिला अधिकारी असल्याचे कार्यालयीन सूत्राने सांगितले. त्यामुळे वृत्त लिहिस्तोवर संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :SocialसामाजिकCrime Newsगुन्हेगारी