तक्रार मागे घेण्याकरिता महिलेस धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST2021-05-07T04:14:02+5:302021-05-07T04:14:02+5:30

अमरावती : पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेला धमकी देऊन तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवारी बापटवाडी ...

The woman threatened to withdraw the complaint | तक्रार मागे घेण्याकरिता महिलेस धमकी

तक्रार मागे घेण्याकरिता महिलेस धमकी

अमरावती : पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेला धमकी देऊन तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवारी बापटवाडी परिसरात उघडकीस आली.

कपिल जैन (४० रा. बापटवाडी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच अपार्टमेंटमध्ये राहत असून, कपिल जैनच्या त्रासामुळे महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी कपिलने महिलेला धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केली. अश्लील हातवारे करून तिचा विनयभंग केला. तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी कपिल जैनविरुध्द गुन्हा नोंदविला.

00000000000000000000000000

महाविरनगरातील जुगार पकडला

अमरावती : राजापेठ पोलिसांनी बुधवारी महाविरनगरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच जणांना अटक केली. विनोद कन्हैयालाल गुप्ता (४० ), वासुदेव महादेव सुने (६०), मधुकर शामराव बोचरे (६५), विठ्ठल हरिभाई सगणे (३८ चारही रा. देशपांडे प्लॉट), धनंजय देवराव सावरकर (२७) व प्रदिप घुरु बोयत (३४ दोन्ही रा. महाविरनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १ हजार ९६० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. त्यांना समजपत्रावर सोडण्यात आले.

000000000000000000000

गळफास लावून इसमाची आत्महत्या

अमरावती : गळफास लावून एका इसमाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील वरुडा गावात उघडकीस आली. ज्ञानेश्वर महादेव पिसे (४८ रा. वरुडा) असे मृताचे नाव आहे. रविंद्र ज्ञानेश्वर पिसे (२८ रा. दाभा) यांच्या माहितीवरून बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार इकबाल यांनी केला.

Web Title: The woman threatened to withdraw the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.