शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेची बलात्कार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 18:32 IST

भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेवर अतिप्रसंग करून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास उघड झाली.

ठळक मुद्देलोणी येथील घटना : अज्ञाताविरुद्ध गुन्हे, एसपी, एएसपींची भेट

अमरावती : भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या महिलेवर अतिप्रसंग करून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध हत्या व बलात्काराचा गुन्हा नोंदविला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत महिला ही ४२ वर्षांची होती, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

पोलीस सूत्रानुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील सासर असलेली ती विवाहिता आपल्या मुलांसमवेत ४ डिसेंबर रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी येथे माहेरी भाऊबीजेसाठी आली होती. दरम्यान, ती दुपारी ३ च्या सुमारास शौचास जाते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र, बराच वेळ होऊनही ती न परतल्याने पित्यासह कुटुंबातील अन्य सदस्यांनी तिचा शोध घेतला. उशिरा रात्री लोणी पोलीस ठाण्यात फिर्याददेखील नोंदविण्यात आली. रात्रभर तिचा शोध घेण्यात आला. रविवारी सकाळी पुन्हा शोधाशोध सुरू झाली.

सकाळी ८.३०च्या सुमारास लोणी बोंधाळ परिसरात ती सिंदीच्या झाडाखाली मृतावस्थेत आढळून आली. मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर पंचनामादेखील करण्यात आला. पंचनाम्याअंती तिची साडीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तर, अतिप्रसंगाची बाबदेखील उघड झाली. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३७६, ३७६ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास, लोणी टाकळीचे ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक एच.जी. कुलवंत करीत आहे.

घटनास्थळावरील एकूणच स्थिती, पंचनामा व मृताच्या वडिलांनी व्यक्त केलेल्या शक्यतेवरून या प्रकरणी हत्या व बलात्काराचा गुन्हा नोंदविला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमरावतीला पाठविला. तपासाला गती दिली आहे.

एच.जी. कुळवंत, ठाणेदार, लोणी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणDeathमृत्यू