शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, दोनवेळा गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 11:10 IST

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर दोन वेळा गर्भपातदेखील करण्यात आला. पुढे लग्नास नकार देत मारहाण करुन तिला वाऱ्यावर सोडल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देशारीरिक शोषण : गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तरुणीवर अत्याचार केला. त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर दोन वेळा गर्भपातदेखील करायला लावला. गर्भपातानंतर पुन्हा मारहाण करून अत्याचार करून लग्नास नकार देत तिला वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

३० ऑक्टोबर रोजी रात्री ही घटना उघड झाली असून या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये पीडितेची राहील मकसूद जादा ( वय १९, पॅराडाइज कॉलनी) याच्यासोबत ओळख झाली. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. डिसेंबर २०२० मध्ये पीडित स्पर्धा परीक्षेच्या शिकवणीसाठी अमरावतीत आली. ती येथे भाड्याने राहत होती. यावेळी राहील तिच्या खोलीवर आला. त्याने तिला लग्नाचे वचन दिले. विश्वास संपादन केल्यानंतर राहीलने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर पीडिता खोली सोडून राहत्या गावी निघून गेली.

यावेळी राहीलने पीडितेचा विश्वास संपादन करून तिला पुन्हा अमरावतीत बोलाविले. त्याने पीडितेला खोली करून दिली. त्यानंतर त्याने वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले. त्यातून पीडितेला गर्भधारणा झाली. ही बाब तिने राहीलला सांगितली. त्यावर राहीलने सध्या लग्न करू शकत नाही, असे म्हणून तिचा गर्भपात केला. त्यानंतरही राहीलने तिला वारंवार कॉल करून लग्नाचे आमिष दाखविले. त्याने पीडितेच्या गावी जाऊन गोंधळ घातला. त्यानंतरही राहीलने लग्नाचे आमिष व धमकी दिल्याने पीडिता पुन्हा अमरावतीत आली. यावेळी राहीलने भाड्याने खोली करून पीडितेवर वारंवार अत्याचार केला. त्यामुळे पीडितेला पुन्हा गर्भधारणा झाली. याबाबत तिने राहीलला माहिती दिली. त्यावर राहीलने तिला टाळाटाळ करून गर्भपात करण्यास सांगितले.

घरातून हाकलले, मारहाणदेखील

पीडितेने राहीलच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या मुलाच्या प्रतापाची माहिती दिली. लग्नाबद्दल विचारणा केली. त्यावर त्यांनी आपल्याला शिवीगाळ करून हाकलून दिल्याचे पीडितेने म्हटले आहे. पीडिता पुन्हा राहीलच्या घरी गेली. यावेळीही तिला धमकी देऊन हाकलून लावण्यात आले. त्यामुळे पीडितेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राहीलसह त्याच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळ