महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:26 IST2021-02-05T05:26:43+5:302021-02-05T05:26:43+5:30
------------------------------------------------ आनंदनगरात महिलेचा विनयभंग अमरावती: खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर येथील एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. रविवारी ही घटना ...

महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ
------------------------------------------------
आनंदनगरात महिलेचा विनयभंग
अमरावती: खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर येथील एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. रविवारी ही घटना घडली. नीलेश दौलतराव सावरकर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४, ४५२, ३२४, २९४, ५०४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविला.
------------------------------------------------------------------
यशोदानगरात युवकावर चाकुहल्ला
अमरावती : क्षुल्लक कारणावरून एका युवकावर तिघांनी संगनमत करून चाकुहल्ला चढविला. युवकाने चाकूचा वार हुकविला तरी त्याच्या गळ्यावर किरकोळ इजा झाली. अमन बाबाराव देवळेकर ( रा. अमरावती) दोन्य अन्य इसमाविरुद्ध भादंविचे कलम ३२४,५०४,३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
--------------------------------------------------------------
संशियत आरोपीस अटक
अमरावती : बडनेरा पोलिसांनी खंडेलवालनगरातून रविवारी रात्री एका संशयिताला अटक केली. निखिल दुर्याधन काळे (२६, रा. काटआमला) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.