‘त्या’ महिलेचा अज्ञात इसमाने केला खून
By Admin | Updated: June 4, 2016 00:05 IST2016-06-04T00:05:35+5:302016-06-04T00:05:35+5:30
गुरूवारी घरातील बाथरूममध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या त्या महिलेचा अज्ञात इसमाने घरात शिरून खून केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले...

‘त्या’ महिलेचा अज्ञात इसमाने केला खून
वाढोणा रामनाथ : गुरूवारी घरातील बाथरूममध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या त्या महिलेचा अज्ञात इसमाने घरात शिरून खून केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले असून याप्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ नुसार अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
शालिनी दिलीप चौधरी (४५) असे मृताचे नाव आहे. घटनेच्या वेळी सदर महिला घरात एकटीच होती. महिलेची दोन्ही मुले बाहेरगावी शिकतात तर पती दिलीप चौधरी त्यावेळी कांरजा लाड येथे तूर विक्रीसाठी गेले होते. दुपारी २.३० वाजता परतल्यानंतर त्यांना पत्नीचा मृतदेह आढळून आला. तत्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आले. महिलेच्या अंगावरील मारहाणीच्या खुणा व घटनास्थळाची परिस्थिती बघता पोलिसांनी अज्ञात इसमाविरूध्द खूनाचा गुन्हा नोंदविला आहे.