हिवरखेड येथे कारच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST2021-06-03T04:10:42+5:302021-06-03T04:10:42+5:30

मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड येथे कारने दिलेल्या धडकेत महिला ठार झाली. ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. ...

Woman killed in car crash at Hivarkhed | हिवरखेड येथे कारच्या धडकेत महिला ठार

हिवरखेड येथे कारच्या धडकेत महिला ठार

मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड येथे कारने दिलेल्या धडकेत महिला ठार झाली. ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला.

हिवरखेडनजीक बजरंगी ढाब्याजवळ एमएच २७ एआर ८६४० क्रमांकाच्या कारने नागपूरहून लग्न समारंभ आटोपून परतवाडा येथे जात निघालेल्या चालकाला डुलकी लागल्याने त्याचे नियंत्रण सुटून भरधाव कार उलटली. या अपघातात चालकाची दुसरी पत्नी रुकसाना बेगम (रा. कामगार नगर, नागपूर) हिचा घटनास्थळावर मृत्यू झाला. पहिली पत्नी गंभीर जखमी झाली. जखमींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी औषधोपचार केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यांना अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले. सदर अपघात ३१ मे रोजी रात्री घडली. मोर्शी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक हेमंत कडुकार यांच्या तक्रारीवरून नियाज अहमद शेख रसूल कुरेशी (५२, रा. कामगारनगर, नागपूर) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ ) अन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास मोर्शी पोलिस करीत आहेत.

Web Title: Woman killed in car crash at Hivarkhed