शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

प्रेयसी तीन महिन्यांची गर्भार; ‘लिव्ह इन पार्टनर’ रफुचक्कर!

By प्रदीप भाकरे | Updated: May 25, 2023 17:34 IST

विवाहितेने घेतली ठाण्यात धाव : आरोपी पळाला युपीला

अमरावती : ‘लिव्ह इन’मध्ये राहत असताना पार्टनरने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने महिला पार्टनर तीन महिन्यांची गर्भवती झाली. त्याबाबतच सांगताच लिव्ह इन पार्टनरने तिला वाऱ्यावर सोडत अमरावतीतून पळ काढला. २४ मे रोजी रात्री हा प्रकार उघड झाला. राजापेठ पोलिसांनी २३ वर्षीय पिडिताच्या तक्रारीवरून आरोपी आदित्यसिंग ठाकूर (२१, रा. बरकतपूर, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश) याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

तो आपल्याला एकाकी सोडून मुळगावी गेला असावा, या शक्यतेने पिडिताने त्याच्या वडिलांना फोनवरून संपर्क साधला. मात्र आदित्यसिंग हा गावी परतला नाही, त्याच्याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही, असे उत्तर मिळाल्याचे पिडिताने म्हटले आहे. ११ मे २०२२ पासून आरोपीने लिव्ह इन मध्ये राहत वारंवार आपले लैंगिक शोषण केले. मात्र गर्भारपणाचे सांगताच त्याओ आपल्याला शिविगाळ व मारहाण केली. तथा १५ दिवसांआधी कुणाला काहीही न सांगता तो निघून गेल्याचे पिडिताचे म्हणणे आहे.ती दोन मुलांची आई

पिडिताचे काही वर्षांपुर्वी पहिले लग्न झाले. पहिल्या पतीपासून तिला दोन मुले आहेत. मात्र, पती दारूच्या आहारी गेल्याने व तो मारहाण करत होता. दोघांमध्ये नेहमीच वाद झडायचे. अशातच पहिला पती तिला सोडून दुसरीकडे राहायला गेला. दरम्यानच्या काळात तिच्या पहिल्या पतीने त्याचा नातेवाईक असलेल्या आदित्यसिंग ठाकूर याला कामानिमित्त अमरावतीला आणले. काही दिवसांनी पिडिता व त्याची ओळख झाली. दोघांमध्ये संवाद सुरू झाला.

तिलाही वाटले तो आधार बनेल!

भाभी खुप त्रासात आहे, मी तुला आनंदात ठेवेन, जीवनभर साथ देईल, असे तो बरळला. त्यामुळे तिला देखील धीर आला. आदित्यसिंह आपल्याला आधार देईन, असा विचार करून तिनेही त्याच्या बेगडी प्रेमाला होकार भरला. प्रेम व लग्नाची बतावणी करून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध केले. त्यानंतर लग्न न करताही तो वारंवार शोषण करीत राहिला. अखेर त्याने पळ काढल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. आपण भाड्याच्या खोलीत राहतो. दोन मुुलांचा सांभाळ, भाडे व अन्य खर्चाला देखील पैसे नसल्याने आरोपीला अमरावतीला बोलावण्याची आर्जव तिने राजापेठ पोलिसांकडे केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती