शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

लॅपटाॅपची निकड सांगून बोलावले; गुंगीचे औषध देऊन सर्वस्व लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 16:53 IST

त्याने तिच्यावर जबरी अतिप्रसंग केला. कुणालाही सांगू नकोस, वाच्यता केल्यास तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली.

ठळक मुद्देवारंवार बलात्कार : बदनामी करण्याची धमकी

अमरावती : लॅपटॉपची निकड सांगून तिला अपार्टमेंटमध्ये बोलावण्यात आले. तेथे शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्यावर शारीरिक बळजबरी करण्यात आली. त्यानंतरही त्याने वारंवार बदनामीची धमकी देत तिचे सर्वस्व लुटले. मात्र, नकार दिल्यानंतर त्याने शरीरसंबंधासाठी ये, अन्यथा कुठेच तोंड दाखवायच्या लायकीची ठेवणार नाही, अशी गर्भित धमकी दिली. त्या अनन्वित छळाला कंटाळून तिने रविवारी अखेर बडनेरा पोलीस ठाणे गाठले.

तक्रारीनुसार, फिर्यादी तरुणीने सन २०१६ मध्ये येथील एका महाविद्यालयात बी.एस्सी. कॉम्प्युटरकरिता प्रवेश घेतला होता. दरम्यान, सन २०१८ मध्ये कंपनीच्या एका मुलाखतीकरिता ती विद्याभारती कॉलेजमध्ये गेली असता, तेथे आरोपी शुभम मुरलीधर बोंडे (२७, रा. कमल प्लाझा, दस्तुरनगर, अमरावती) याच्याशी तिची ओळख झाली. दोघांमध्ये टेलिफोनिक संवाद सुरू झाला. शिक्षणासाठी काही मदत लागली तर सांग, करेन, अशी बतावणी आरोपीने तरुणीकडे केली.

दरम्यान, ६ जानेवारी २०१९ रोजी तुझ्या लॅपटॉपची आवश्यकता आहे, असा कॉल शुभमने तिला केला. लॅपटॉप घेऊन त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता अकोली ते खंडेलवाल रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये तिला बोलावले. तेथे तिला शीतपेय देण्यात आले. ते प्राशन करताच तिला गुंगी आली. त्याने तिच्यावर जबरी अतिप्रसंग केला. कुणालाही सांगू नकोस, वाच्यता केल्यास तुझी बदनामी करेल, अशी धमकी त्याने तिला शुद्ध आल्यानंतर दिली.

पुन्हा बलात्कार

१९ मार्च २०२२ रोजी रात्री १०.३० वाजता शुभमने पुन्हा तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध ठेवले. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेला फोन केला. माझ्यासोबत शारीरिक संबंध कर, नाहीतर तुझी बदनामी करतो, अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तिने १२ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बडनेरा पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक सुषमा आठवले यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले. आरोपी शुभम बोंडेविरुद्ध कलम ३७६ (२), एन, ३२८, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती