महिलेने ‘त्याला’ सिनेस्टाईल बदडले

By Admin | Updated: March 23, 2015 23:51 IST2015-03-23T23:51:54+5:302015-03-23T23:51:54+5:30

जिल्हा कचेरी परिसरात एका महिलेने चपला, काठीने एका वयस्क इसमास सिनेस्टाईल चोप दिला.

The woman changed her 'Cinecastle' | महिलेने ‘त्याला’ सिनेस्टाईल बदडले

महिलेने ‘त्याला’ सिनेस्टाईल बदडले

कलेक्टरच्या दालनासमोरील घटना : जिल्हाधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात !
अमरावती
: जिल्हा कचेरी परिसरात एका महिलेने चपला, काठीने एका वयस्क इसमास सिनेस्टाईल चोप दिला. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या घटनेचे अनेक साक्षीदार असले तरी आम्हाला काहीच माहिती नाही, अशी आश्चर्यकारक भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.
त्याचे झाले असे की, एका स्वस्त धान्य दुकानदार महिलेस विजय श्रीखंडेकर (रा. गोडबाबा मंदिर) हे त्रास देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. वडाळी परिसरात असलेल्या त्या महिलेच्या रेशन दुकानात श्रीखंडेकर कामावर होते. त्यांना कामावरुन कमी केल्याने ते विविध प्रकारे त्रास देत असल्याचा आरोप महिलेचा आहे. जिल्हा कचेरीत आज दोघांमध्ये अशीच वादावादी झाली. संतापलेल्या महिला दुकानदाराच्या मुलीने चपला, काठीने त्या इसमाला बदडले. त्यानंतर तिने या प्रकरणाची तक्रार गाडगेनगर पोलीस ठाण्यात नोंदविली. ही फ्री स्टाईल बघण्यासाठी कर्मचारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मी अनभिज्ञच !
जिल्हाधिकारी किरण गित्ते म्हणाले, झालेल्या प्रकाराबाबत मला काहीही कल्पना नाही. प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीकडूनच हा प्रकार कळला. याविषयीची कुठलीच तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही.
यापूर्वीही दारू दुकानाला विरोध करणाऱ्या आंदोलकांमधील एका इसमाने जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनावर ठिय्या दिला होता.

Web Title: The woman changed her 'Cinecastle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.