शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अबला नव्हे सबला; ‘चान्स’ मागणाऱ्याला लाथाडले! पतीलाही चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 18:35 IST

दारूची पार्टी करून, घरी मुक्कामी राहणाऱ्या व वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पतीच्या मित्राला लाथाडून एका महिलेने हिमतीने स्वसंरक्षण केले. तो जसे करतो तसे करू दे, असे निर्लज्जपणे सांगणाऱ्या पतीलाही तिने चपराक हाणली.

ठळक मुद्देस्वसंरक्षण करून पोहोचली पोलिसांत

अमरावती : दारूची पार्टी करून, घरी मुक्कामी राहणाऱ्या व वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पतीच्या मित्राला लाथाडून एका महिलेने हिमतीने स्वसंरक्षण केले. तो जसे करतो तसे करू दे, असे निर्लज्जपणे सांगणाऱ्या पतीलाही तिने चपराक हाणली. रात्र कशीबशी काढून तिने पोलीस ठाणे गाठले. न्यू स्वाभिमान नगरात २६ डिसेंबर रोजी रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली.

२५ डिसेंबर रोजी रात्री ८ च्या सुमारास फिर्यादी महिला कामावरून घरी परतली. तेव्हा तिचा पती व त्याचा मित्र सुनील माळोदे (५१, रा. हनुमाननगर) हे घरातच दारू व जेवण आटोपून बसलेले होते. रात्र झाली, तुमच्या मित्राला त्याच्या घरी जायला सांगा, असे तिने पतीला बजावले. मात्र, त्याला न तसे सांगता पतीने तिला शिवीगाळ केली. तथा तो येथेच झोपेल, असे बजावले. त्यामुळे फिर्यादी महिला जेवण करून घराच्या एका कोपऱ्यात झोपी गेली.

रात्री दोनच्या सुमारास सुनील माळोदे याने तिला पाणी मागितले. पाणी देऊन ती पुन्हा झोपी गेली असता, त्याने स्पर्श करून तिला उठविले. तिला घाणेरडी मागणी केली. त्यावर तिने पतीला उठविले. तुमचा दोस्त कसा करतो आहे, ते सांगितले असता, त्याला काहीही न म्हणता पतीने तिलाच चूप बसण्यास सांगितले. तिने १५ व १४ वर्षाच्या मुलांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उठले नाहीत. त्यामुळे तिने पतीला चपराक हाणली. त्यामुळे चवताळलेल्या पतीने तिला पकडण्याचे फर्मान मित्र सुनीलला सोडले. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी तिने सुनीलला लाथाडले. तो खाली पडल्याची संधी साधत ती घराबाहेर पडली. दाराची कडी बाहेरून लावून घेत, पहाट होईपर्यंत ती आवारातील बाथरूममध्ये बसून राहिली.

मुलांना मारण्याची धमकी

२६ डिसेंबर रोजी सकाळी ती कशीबशी घरात गेली. त्यावेळी पती व सुनील माळोदे या दोघांनी तिला रात्रीच्या घटनेची वाच्यता केल्यास दोन्ही मुलांचे काय करेल, हे सांगता येत नाही, त्यांना मारून टाकेन, अशी धमकी दिली. त्यामुळे चार दिवस तिने दहशतीत काढले. मात्र, मनाचा हिय्या करून अखेर १ जानेवारी रोजी दुपारी राजापेठ पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी महिलेच्या पतीसह सुनील माळोदे याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३५४, ३५४ अ, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :WomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारliquor banदारूबंदी