दिशा संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याची साक्ष

By Admin | Updated: March 6, 2016 00:02 IST2016-03-06T00:02:12+5:302016-03-06T00:02:12+5:30

तपोवन वसतिगृहात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शुक्रवारी पीडित मुलीचे इन कॅमेरा साक्ष नोंदविण्यात आली.

Witness of the Director of Women's Organization | दिशा संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याची साक्ष

दिशा संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्याची साक्ष

तपोवन प्रकरण : अन्य चार प्रकरणांत १५ मार्चपासून सुनावणी
अमरावती : तपोवन वसतिगृहात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शुक्रवारी पीडित मुलीचे इन कॅमेरा साक्ष नोंदविण्यात आली. शनिवारी दिशा संस्थेच्या एका महिला पदाधिकाऱ्याची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली आहे. याप्रकरणाशी संबंधित असलेल्या अन्य प्रकरणांच्या सुनावणीला १५ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
२० डिसेंबर २०१४ रोजी तपोवनच्या वसतिगृहातील घडलेल्या एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आरोपी दादाराव गोटीराम खंडारे (५०, रा. तपोवन) विरुध्द गुन्हा नोंदविला होता. अनाथ मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे दोषारोपत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्यानंतर प्रथम सुनावणीत शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालय (२) चे न्यायाधीश एस.डब्लू. चव्हाण यांच्या न्यायालयात पीडित मुलीची इनकॅमेरा साक्ष नोंदविण्यात आली. त्यानुसार जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी न्यायालयात पीडित मुलीची साक्ष नोंदविली. लैंगिक अत्याचार पीडिताच्या पुनर्वसन व त्यांना समुपदेश करणारी दिशा संस्थेच्या पदाधिकारी रुपाली निबंरते यांनी शनिवारी न्यायालयात साक्ष नोंदविली. पुढील सुनावणीची तारीख न्यायालयाने १७ मार्च दिली आहे. त्यादिवशी पोलिसांची साक्ष नोंदविली जाईल, अशी माहिती शासकीय अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी दिली.

Web Title: Witness of the Director of Women's Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.