शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

सहा दिवसांत एसटीचे अडीच कोटींचे उत्पन्न बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २,६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. काही कर्मचाºयांना गरजेनुसार बोलविण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती जिल्ह्यात आठ आगार, १४ बसस्थानक आहेत. एकूण ४०५ बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यामध्ये ४५ शिवशाही बसेसचाही समावेश आहे.

ठळक मुद्देसूचना : चालक-वाहक, इतर कर्मचाऱ्यांनी घरीच राहावे

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रविवार २२ मार्च रोजी पुकारलेला जनता कर्फ्यू व त्यानंतर लागू झालेली संचारबंदी व आता २१ दिवसांकरिता संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याने सहा दिवसांपासून एसटीची चाके पूर्णता: थांबली आहे. दरदिवसाला एसटीचे ४० लाखांचे जिल्ह्यात उत्पन्न मिळते. त्यामुळे सहा दिवसांत दोन कोटी ४० लाखांचे एसटीचे उत्पन्न बुडाले आहे.राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीच्या २,६५० अधिकारी, कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याच्या सूचना आहेत. काही कर्मचाºयांना गरजेनुसार बोलविण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीकांत गभणे यांनी ‘लोकमत’ला दिली. अमरावती जिल्ह्यात आठ आगार, १४ बसस्थानक आहेत. एकूण ४०५ बसेस रस्त्यावर धावत होत्या. त्यामध्ये ४५ शिवशाही बसेसचाही समावेश आहे. बसने प्रवास करताना कुणालाही संसर्ग होऊ नये, याकरिता जनता कर्फ्युमुळे सुरक्षित अंतर ठेवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र, देशात संचारबंदी लागू झाल्याने देशच 'लॉकडाऊन' करण्यात आल्याने सहा दिवसांपासून एसटीची चाकेसुद्धा थांबली आहेत.जिल्ह्यात ८२५ चालक, ८७५ वाहकासह मॅकेनिकल आॅफिस कर्मचारी असे एकूण २,६५० कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळणयाकरिता त्यांनी आपआपल्या घरीच राहावे, अशा सूचना एसटी महामंडळाने दिल्या आहेत. जिल्ह्यात ४०५ बसेसच्या एकूण २,४३० फेºया होत होत्या. त्याकरिता रोज ३० हजार लिटर डिझेल लागत होते. त्याकारणाने रोज १८ लाख ६० हजारांचे, तर सहा दिवसांत एक कोटी ११ लाख ६० हजारांचे डिझेल लागत होते. ते वगळता इतर उर्वरित एसटीचे उत्पन्न होते. मात्र, कोरोनामुळे त्या उत्पन्नावर महामंडळाला पाणी सोडावे लागत आहे.‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता कर्मचाºयांना घरातच राहण्याच्या सूचना आहे. रोेज अंदाजे ४० लाखांचे उत्पन्न होते. सहा दिवसांत २ कोटी ४० लाखांचा फटका बसला. मात्र संपूर्ण देशच 'लॉकडाऊन'मध्ये असल्याने शासनाच्या आदेशाचे सर्वांगाने पालन करीत आहोत.- श्रीकांत गभणे, विभाग नियंत्रक अमरावती

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस