१२ भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST2021-07-08T04:10:13+5:302021-07-08T04:10:13+5:30

धामणगाव रेल्वे : मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडण्यासाठी विधानसभेत गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करून ...

Withdraw the suspension of 12 BJP MLAs | १२ भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्या

१२ भाजप आमदारांचे निलंबन मागे घ्या

धामणगाव रेल्वे : मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडण्यासाठी विधानसभेत गेलेल्या भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करून महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांचा आवाज बंद केला. ही लोकशाहीची हत्या असल्याचे तालुका प्रशासनाच्यावतीने राज्यपालांना निवेदन पाठवून भाजप शहर व भाजप महिला आघाडीच्यावतीने आमदारांची निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा प्रश्नांवर विधानसभेत चर्चा होणे गरजेचे आहे. भाजपचे आमदार ही मागणी करीत असताना तसेच राज्य सरकारला मराठा आरक्षण वाचवण्यात आलेले अपयश तसेच ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाविषयी उदासीन असल्याने राज्य सरकारला कोणतेही योग्य पाऊल उचलता न आल्यामुळे थेट आमदारांना निलंबित करण्यात आले. ही बाब आता सर्वसामान्य जनतेला कळले आहे. त्यामुळे राज्यपालांनी निलंबित केलेल्या आमदारांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा आणि विधानसभा अध्यक्षांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहर अध्यक्ष गिरीश भुतडा, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष नलिनी मेश्राम, माजी नगराध्यक्ष अर्चना राऊत, अशोक शर्मा, नगरसेवक विनोद धुवे, गणेश ठाकूर, नगरसेवक बंडू पाटील, अनिल गोडबोले, शरद काळे, विनोद कावळे, नगरसेविका दर्शाना ठाकूर, सीमा देवतळे, जयश्री किन्नाके, विद्या राऊत, रीता बोरगावकर, नगरसेविका अर्चना गोडबोले, मंगला दुधाट यांची उपस्थिती होती.

Web Title: Withdraw the suspension of 12 BJP MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.