प्रस्तावित विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात
By Admin | Updated: November 2, 2015 00:27 IST2015-11-02T00:27:40+5:302015-11-02T00:27:40+5:30
प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ हिवाळी अधिवेशनात सादर केल्या जाईल, ...

प्रस्तावित विद्यापीठ कायदा हिवाळी अधिवेशनात
विनोद तावडे यांची ग्वाही : परिसंवादात उपस्थितांनी दिल्या सूचना
अमरावती : प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ हिवाळी अधिवेशनात सादर केल्या जाईल, अशी ग्वाही रविवारी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परिसंवादादरम्यान दिली. परिसंवादात उपस्थितांनी कायद्याविषयक सूचनाही दिल्यात.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दृकश्राव्य सभागृहात प्रस्तावित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१५ वर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी संघटना, पदाधिकाऱ्यांना कायद्यातील तरतुदीविषयक माहिती दिली. कायद्याच्या तरतुदीबाबत संवाद साधल्यावर उपस्थितांकडून सूचना मागवण्यात आल्यात. यामध्ये ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य एस.बी. लोहिया, वसंत घुईखेडकर, अनिल जाधव आदींनी कायद्याविषयक सूचना दिल्यात. चर्चासत्राचा वेळ कमी असल्याने त्यांच्या सूचना ई-मेलने पाठविण्याचे सांगण्यात आले.