‘परिवर्तन’ची विजयी आघाडी

By Admin | Updated: October 20, 2015 00:12 IST2015-10-20T00:12:47+5:302015-10-20T00:12:47+5:30

डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅप बँकेच्या १७ संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत संजय वानखडे प्रणित परिवर्तन पॅनेल आघाडीवर आहे.

The winning combination of 'change' | ‘परिवर्तन’ची विजयी आघाडी

‘परिवर्तन’ची विजयी आघाडी

डॉ.पंजाबराव देशमुख बँक निवडणूक: रात्री उशिरापर्यंत मतमोजणी
अमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅप बँकेच्या १७ संचालकांसाठी झालेल्या निवडणुकीत संजय वानखडे प्रणित परिवर्तन पॅनेल आघाडीवर आहे. रात्री ९.३० वाजता आलेल्या दुसऱ्या फेरीच्या निकालाअंती परिवर्तन पॅनेलने विजयी आघाडी कायम ठेवली आहे. पहिल्या फेरीअखेर परिवर्तनच्या १७ ही उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली होती. वसंत लवणकर यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनेल आणि डॉ. पंजाबराव देशमुख पॅनेलला मोठ्या पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता आहे. वृत्त लिहिस्तोवर कोणत्याही उमेदवाराच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती.
अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि अकोला या चार जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-आॅप बँकेमध्ये १७ संचालक निवडून देण्यासाठी रविवारी मतदान घेण्यात आले व आज सोमवार सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली.
पहिल्या फेरीअखेर परिवर्तन पॅनेलचे बाळकृष्ण अढाऊ (२४५९), रवींद्र कडू (२३८३), प्रशांत डवरे (२७१२), ओंकार बंड (२१५२), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघात संजय भीमराव खडसे (२८३३), इमावमध्ये गजानन वानखडे (२९१४), विमुक्त भटक्या मतदारसंघातून सुनील लव्हारे (२५२२), महिला राखीवमधून अंजली प्रशांत ठाकरे (२६२७) व शोभना भूईभार (२४८०) आदींनी विजयी आघाडी घेतली आहे.
परिवर्तन पॅनेलच्या ज्या १७ उमेदवारांनी वृत्त लिहेस्तोवर विजयी आघाडी घेतली त्यात बाळकृष्ण अढाऊ, रवींद्र कडू, प्रशांत डवरे, हेमंत देशमुख, ओंकार बंड, राजेंद्र महल्ले, सुरेश शिंगणे, शरद अढाऊ, दिलीप कोकाटे, गिरीश भारसाकळे, अशोक वडस्कर, संजय वानखडे, संजय खडसे, सुनील लव्हाळे, अंजली प्रशांत ठाकरे, शोभना पंजाबराव भूईभार यांचा समावेश आहे.

Web Title: The winning combination of 'change'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.