सहकार क्षेत्रातही वाहू लागले निवडणूकीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST2021-02-06T04:21:09+5:302021-02-06T04:21:09+5:30

अमरावती : राज्य शासनाने सहकारीतील बँकांचा सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठविली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही ...

The winds of elections began to blow in the field of co-operation as well | सहकार क्षेत्रातही वाहू लागले निवडणूकीचे वारे

सहकार क्षेत्रातही वाहू लागले निवडणूकीचे वारे

अमरावती : राज्य शासनाने सहकारीतील बँकांचा सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठविली आहे. यामुळे आता जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याकडे सहकारातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे राज्यभरातील जिल्हा बँका, नागरी सहकारी बँका, साखर कारखाने, विकास सेवा सोसायटी आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरापासून रखडल्या होत्या. गत जानेवारी महिन्यात सहकार क्षेत्रातील १४ संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. अशातच कोरोना संसर्गामुळे गत १८ मार्चच्या आदेशामुळे १७ जूनपर्यंत विविध टप्प्यांवर काढण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अशातच १६ जानेवारीच्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली. अशातच २ फेब्रुवारी रोजीचा आदेश रद्द करत आता ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगिती केल्या होत्या त्या टप्प्यापासून पुढे प्रक्रिया राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे आता सहकारी क्षेत्रातही निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत.

Web Title: The winds of elections began to blow in the field of co-operation as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.