शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

घाटावरच्या हळदीला मिळणार का अनुदानाचे टॉनिक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 5:00 AM

‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त संत्र्यासह हळदीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड क्षेत्र होते. घाटावरची ही गावरान हळद विदर्भासह परप्रांतातून सुद्धा येथे व्यापारी येऊन खरेदी करायचे. हळदी मुळे शेंदूरजनाघाट हे गाव देशाच्या नकाशात झळकले होते. गतकाळी येथे हळदीच्या उत्पादनातून निघणाऱ्या कुंकवाचे कारखाने होते. या कुंकवाची निर्यात केली जायची. काळाच्या ओघात हळदीचे उत्पादन घातल्याने कुंकू कारखाने बंद पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड/शेंदूरजनाघाट : शेंदूरजना घाटची हळद ही ‘घाटावरची हळद’ म्हणून विदर्भात प्रसिद्ध होती. राज्याबाहेर सुद्धा येथील हळदीला मागणी होती. हळद उत्पादकांसह मजुरांनाही यामुळे हंगामात सुगीचे दिवस यायचे. मात्र काळानुसार उत्पादन घटल्याने खर्चसुद्धा परवडत नसल्याने हळदीचे क्षेत्र  कमी होऊ लागले आहे. व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने आणि  बाजारपेठ उपलब्ध नसल्याने कवडीमोल भावाने हळद विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर सद्यस्थितीत आली आहे. घाटावरच्या या पिवळ्या सोन्याला उतरती कळा लागल्याने पीक हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने मसाले पिकांना  अनुदानावर लागवडीची योजना हळदीसाठी  जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.‘विदर्भाच्या कॅलिफोर्निया’त संत्र्यासह हळदीचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड क्षेत्र होते. घाटावरची ही गावरान हळद विदर्भासह परप्रांतातून सुद्धा येथे व्यापारी येऊन खरेदी करायचे. हळदी मुळे शेंदूरजनाघाट हे गाव देशाच्या नकाशात झळकले होते. गतकाळी येथे हळदीच्या उत्पादनातून निघणाऱ्या कुंकवाचे कारखाने होते. या कुंकवाची निर्यात केली जायची. काळाच्या ओघात हळदीचे उत्पादन घातल्याने कुंकू कारखाने बंद पडले. पिढीजात हळद उत्पादन घेणाऱ्या शेतकरी कुटुंबांनी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने तसेच उत्पादन खर्च वाढल्याने हळदीचे लागवड क्षेत्र कमी केले आहे. 

आता बॉयलर आलेहळकुंड काढल्यानंतर ती उकाड्यावर नेऊन मोठ्या कढई मध्ये शिजवून उन्हात वाळविली जायची,शेकडो मजूर कामावर असायचे. गावात दोन उकाडे होते. उत्पादनच फारसे नसल्याचे आता एकच उकाडा सुरू आहे. कढया हद्दपार होऊन बाॅयलर आले. मजुरांची गच्छंती झाली आहे.

संरक्षणाची मागणी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात हळद विकून मोकळे होण्याची वेळ आली आहे. मसाले पिकात समावेश असलेल्या हळदीला संरक्षण मिळणे गरजेचे आहे. अनुदानावर लागवड करण्याची योजना आवश्यक आहे, असे शेतकरी सांगतात. 

लागवड क्षेत्र घटलेउन्हाळ्यात शेतीची मशागत करून मृगाचा पाऊस आला की, हळदीची लागवड केली जाते. या पिकात एरंडी, मिरची, भेंडी, टमाटर, वाल, काकडी असे आंतरपीक असते. परंतु रोगराई, वातावरणीय बदल आणि पाण्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस हळदीच्या लागवड क्षेत्रात मोठी घट  झाली आहे. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती